मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनाला संपवणं हे आपल्याच हातात, WHO च्या अध्यक्षांनी सांगितली जगभरातील Covid-19ची सद्यस्थिती

कोरोनाला संपवणं हे आपल्याच हातात, WHO च्या अध्यक्षांनी सांगितली जगभरातील Covid-19ची सद्यस्थिती

World Health Organisation chief: जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)अध्यक्ष अधानोम घेब्रेयेसस (Adhanom Ghebreyesus)यांनी एक वक्तव्य केलं आहे.

World Health Organisation chief: जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)अध्यक्ष अधानोम घेब्रेयेसस (Adhanom Ghebreyesus)यांनी एक वक्तव्य केलं आहे.

World Health Organisation chief: जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)अध्यक्ष अधानोम घेब्रेयेसस (Adhanom Ghebreyesus)यांनी एक वक्तव्य केलं आहे.

नवी दिल्ली, 31 जुलै: सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) विळख्यात अडकलं आहे. सर्वच देश कोरोना व्हायरससारख्या महामारीला तोंड देत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)अध्यक्ष अधानोम घेब्रेयेसस (Adhanom Ghebreyesus)यांनी एक वक्तव्य केलं आहे. जेव्हा जगाला वाटेल तेव्हा कोरोना महामारी संपेल. कोरोनाला संपवणं हे आपल्याच हातात आहे.

अधानोम घेब्रेयेसस म्हणाले की, जेव्हा जगाला वाटेल की कोरोना संपवावा, तेव्हा कोरोना महामारी संपून जाईल. कोरोनाला नष्ट करणं हे संपूर्ण आपल्या हातात आहे. आपल्याकडे सर्व आवश्यक उपकरणं आहेत. आपण हा आजार थांबवू शकतो. आपण त्याची चाचणी करू शकतो आणि नंतर त्यावर उपचार करू शकतो.

पुढे ते म्हणतात की, गेल्या आठवड्यात WHO (World Health Organisation) नं जवळपास 40 लाखांहून कोरोनाचे केसेस नोंदवले. तसंच गेल्या चार आठवड्यात WHO नं सहा क्षेत्रांपैकी सरासरी, कोविड -19 संसर्गामध्ये 80 टक्क्यानं वाढ झाली आहे. या काळात आफ्रिकेतील मृतांची टक्केवारी 80 टक्क्यानं वाढली आहे.

दुप्पट टोल टाळायचा असेल तर पाळा Fastag चे हे 5 नियम

धक्कादायक म्हणजे जगभरात नव्यानं नोंद होणाऱ्या रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून येत आहे. यावर्षी भारतात आलेल्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत या व्हेरिएंटनं थैमान घातलं होतं.

WHOने चेतावणी दिली आहे की, कोरोना व्हायरसचं संकट सुरु झाल्यापासून आतापर्यंत त्याच्यामध्ये सतत बदल होत आहेत. त्यामुळे येत्या काळातही त्यात बदल होत राहणार असून कोरोनाचे धोकादायक चार व्हेरिएंट आतापर्यंत समोर आलेत.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases, Who