Home /News /mumbai /

MLC Election : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सुक्ष्म प्लॅनिंग, अखेर शिवसेना आमदारांकडून मोहिम फत्ते!

MLC Election : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सुक्ष्म प्लॅनिंग, अखेर शिवसेना आमदारांकडून मोहिम फत्ते!

 खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी घेत कमान आपल्या हातात घेतली होती.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी घेत कमान आपल्या हातात घेतली होती.

Vidhan parishad Election 2022: खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खबरदारी घेत कमान आपल्या हातात घेतली होती.

    मुंबई, 20 जून : विधानसभा निवडणुकीसाठी (MLC Election result) मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे शिवसेनेनं चोख फिल्डिंग लावून मतदान पूर्ण केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. त्यामुळे शिवसेनेनं अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी जवळपास मतदान आता पूर्ण झालं आहे. फक्त अपक्ष आमदारांचे मतदान बाकी आहे. शिवसेनेनं पूर्ण खबरदारी घेत मतदानाची प्रक्रिया पार पाडली आहे.  खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी घेत कमान आपल्या हातात घेतली होती. सकाळी शिवसेनेचे आमदार पवईतील हॉटेलमधून विधान परिषदेत दाखल झाले. एक गट हा आदित्य ठाकरे यांच्यासोबत आला होता. तर दुसरा गट हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेत दाखल झाले आणि त्यांनी सर्व आमदारांना भेटीसाठी बोलावले.  विधान भवनात मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा केली. शिवसेना  5-5 आमदार गट तयार केला होता. आमदारांना चर्चा करूनच पुढे मुख्यमंत्र्यांनी मतदानाला पाठवलं. अखेरीस दुपारपर्यंत शिवसेनेच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. शिवसेनेच्या आमदारांचे मतदान झाले असून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 275 आमदारांचं मतदान पार पडलं. आता बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार, राष्ट्रवादीकडून अजित पवार, माणिकराव कोकाटे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांचं मतदान बाकी आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Shiv sena, Uddhav thackeray, Vidhan parishad maharashtra, Voting

    पुढील बातम्या