मुंबई, 8 नोव्हेंबर: जवळपास दोन वर्षानंतर शासनाकडून कोव्हिड नियम शिथील केल्यानंतर यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात पार पाडली. अशातच दिवीळी सणाचेनिमित्त शिवसेनेच्या प्रवक्त्या व नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दहिसर रिव्हर फेस्टचे नियोजन बद्ध आयोजन केले. या कार्यक्रमाला गेल्या दोन दिवसात सुमारे 25000 नागरिकांनी रस्त्यावर उतरून दहिसर रिव्हर फेस्टला उस्फूर्त प्रतिसाद दिला. पण, कोव्हिडच्या नियमांचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
दहिसर नदीच्या तीरावर शिवकन्या आणि श्रीमंत माउली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि,4 ते 7 नोंव्हेंबर याकाळात अनोख्या "दहिसर रिव्हर फेस्ट" चे आयोजन करण्यात आले होते. तरुणाई बरोबर जेष्ठ नागरिकांनी दहिसर फेस्टचा मनमुराद आनंद लुटला. नागरीकांना गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत दहिसर रिव्हर फेस्टला उस्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, यामध्ये कोरोना नियामांचे उल्लंघन केले असल्याचे पाहायला मिळाले.
झालेल्या या कार्यक्रमात कोणाच्याही तोंडावर मास्क दिसला नाही. तर सोशल डिस्टेंस नियमांचेही उल्लघंन करण्यात आले. सत्तेतील पक्षाच्याच कार्यक्रमात झालेले नियमांचे उल्लघन पाहून पोलिस प्रशासन कारवाई करेल का? असा सवाल उपस्थित होत आहेत.
मुंबई: "social Distancing" चे तीन तेरा; "दहिसर रिव्हर फेस्ट" आयोजित कार्यक्रमात राजकीय नेत्यांसह नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लघंन pic.twitter.com/BWdaot4dyO
— News18Lokmat (@News18lokmat) November 8, 2021
देशासह अनेक राज्यात कोरोनाची तीव्रता कमी आल्याने नियमांमध्ये शिथीलता आणली आहे. जवळजवळ सर्वच मुंबईकरांचे लसीचे डोस पूर्ण झाले आहेत. मुंबईतील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात आल्याचं दिसून येतंय. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या काळ वाढून तो आता 2075 दिवसांवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याप्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसत आहे. पण शनिवारच्या तुलनेत रविवारी काहीशी वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 252 रुग्णांची भर पडली असून केवळ तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शsनिवारी मुंबईत 176 रुग्णांची भर पडली होती.
मागील 24 तासांत देशात दहा हजार 853 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 526 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या चार लाख 60 हजार 791 इतकी झाली आहे. 12 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 44 हजार 845 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 37 लाख 49 हजार 900 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus cases, Diwali 2021, Fight covid, Mumbai, Shivsena