मुंबई, 18 मे : अरबी समुद्रातून सुरूवात झालेल्या तौक्तेचं महभयंकर रुप पाहून नागरिकांनी धसकाच घेतला आहे. काल वेळेच्या आधी तौत्के चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकलं. मात्र तो प्रवास सर्वांसाठी जीवघेणा होता. महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवित हानी झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळामुळे आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे 17 मे 2021 रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याचा अंदाज होता. त्यानुसार 17 आणि 18 मे या दोन्ही दिवशी मुंबई व उपनगरात जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागला.
#CycloneTaukte तौक्ते चक्रीवादळाचा संपूर्ण प्रवास आणि लँडफॉल पाहा उपग्रहाच्या नजरेतून. pic.twitter.com/36bHYYDsE8
— News18Lokmat (@News18lokmat) May 18, 2021
अरबी समुद्रात १६ मे ला तयार होणा-या चक्रीवादळा नुसार आयएमडीने आज, येणा-या 4 दिवसासाठी तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. कोकणात व मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात १४ ते १५मे पासून मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे;शनि/रविवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.रविवारी मुंबईतपण pic.twitter.com/DcTAwBiTwz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 14, 2021
हे ही वाचा-तौत्के वादळ: NDRFच्या 10 टीम्स किनारपट्टीच्या भागात तैनात
या चक्रीवादळाला 'तॉक्ते' हे नाव कोणी दिलं?
हे चक्रीवादळ 2021 वर्षातील पहिलं चक्रीवादळ असणार आहे. या चक्रीवादळाचं नाव तॉक्ते (Tauktae) असून हे नाव म्यानमारनं ठेवलं आहे. तॉक्ते याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल असा होतो. गुजरातबरोबरच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीपला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.