मुंबई, 14 मे: लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या (Arabian sea) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. 15 तारखेच्या पहाटे हा पट्टा आणखी तीव्र होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात (Cyclone) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या (Mumbai) आसपासच्या परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली असून एनडीआरएफ **(NDRF)**च्या टीम्स सुद्धा विविध ठिकाणी तैनात करण्यात येत आहेत. तौत्के चक्रीवादाळात आपत्कालीनल परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन पूर्वतयारीसाठी एनडीआरएफच्या 10 टीम्स तैनात करण्यात येत आहेत. या 10 टीम्सपैकी 2 टीम्स गोव्यात, 2 टीम्स सिंधुदुर्गात, 2 टीम्स रत्नागिरीत, 4 टीम्स गुजरातमध्ये उद्यापासून सज्ज राहणार आहेत.
NDRF says it has moved a team from Maharashtra's Pune to Goa in view of cyclone Tauktae
— ANI (@ANI) May 14, 2021
"Decision on the deployment of NDRF will be taken tomorrow after assessing the situation. Teams are on alert to get deployed on short notice," it says. pic.twitter.com/5dKaXLiBQZ
वाचा: Cyclone Tauktae कोकणात येतंय! वादळांना नावं कशी दिली जातात? ‘तौत्के’चा नेमका अर्थ काय? एनडीआरएफ आणि पालिका आयुक्तांची बैठक तौत्के चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी आणि शहर आपत्कालीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. जोरदार वारे आणि पाऊस पडणार असल्याचं लक्षात घेता मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई मनपाच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येत आहे, समुद्र किनाऱ्याजवळील परिसरात पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी पंप बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. विविध ठिकाणी पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आले आहेत. तौत्के वादळ 15 तारखेच्या पहाटे अधिक तीव्र होऊन त्यानंतरच्या 24 तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याती शक्यता आहे. हे वादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-वायव्य दिशेने गुजरात आणि त्याच्या बाजूच्या किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे. 15 ते 17 मे दरम्यान कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

)







