अजित पवार म्हणतात, सावकरांचं योगदान नाकारू नका; तर काँग्रेसच्या मंत्र्यांचं अभिवादन

अजित पवार म्हणतात, सावकरांचं योगदान नाकारू नका; तर काँग्रेसच्या मंत्र्यांचं अभिवादन

'सावरकरांचं अनेक क्षेत्रातलं योगदान हे नाकारून चालणार नाही. उगाच त्यावरून वाद निर्माण करू नये.'

  • Share this:

मुंबई 26 फेब्रुवारी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानावरून काँग्रेसने वारंवार टीका केली होती. राहुल गांधी यांनीही अतिशय आक्रमक भाषेत सावरकरांना माफीवीर असं संसदेत आणि जाहीरसभांमधूनही म्हटलं होतं. तसच काँग्रेसच्या मुख्यपत्रातही सावरकरांवर टीका करण्यात आली होती. आज (26 फेब्रुवारी )सावरकारांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त भाजपने विधिमंडळाच्या परिसरात सावकरांची प्रतिमा लावून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी त्यांना सावरकरांना अभिवादन करण्याची विनंती केली. त्यानंतर थोरातांनीही सावरकरांना पुष्पांजली अर्पण केली. त्यामुळे राजकीय वातावरणात वेगळी चर्चा सुरू झालीय. तर महापुरुषांचं योगदान नाकारून चालणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवार म्हणाले, महापुरुषांच्या कामावरून वाद होऊ नये. सावरकरांचं अनेक क्षेत्रातलं योगदान हे नाकारून चालणार नाही. उगाच त्यावरून वाद निर्माण करू नये. असा वाद निर्माण करून समाजात गैरसमज पसरविण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

सगळचं संशयास्पद...फक्त पाणी पिण्याचं निमित्त झालं आणि विद्यार्थ्यीनीचा जीव गेला

भाजप करणार शिवसेनेची कोंडी

दरम्यान सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव विधिमंडळात आणण्याचा आग्रह भाजपनं केला होता. मात्र सत्ताधारी पक्षांनी त्याला नकार दिल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. मंगळवारी आझाद मैदानावरच्या भाषणातही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना सत्तेच्या लोभापायी सावरकरांचा अपमान सहन करतेय अशी टीका केली होती.

सविताभाभी नेमकी कुणाची? अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटीस

भाजपच्या टीकेला शिवसेना कसं उत्तर देणार हे सभागृहात स्पष्ट होणार आहे. सावरकरांच्या गौरवाच्या मुद्यावर प्रस्ताव आणण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे या विषयावरून महाआघाडीत मतभेद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेने आत्तापर्यंत या प्रकरणावरुन तरी फारशी दाद भाजपला दिली नाहीये. सावरकर हा शिवसेनेच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. खासदार संजय राऊत यांनी यावरून राहुल गांधी यांच्यावर टीकाही केली होती.

First published: February 26, 2020, 11:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या