मोठी बातमी! उर्मिला मातोंडकर खेळणार राजकारणात दुसरी इनिंग, शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

मोठी बातमी! उर्मिला मातोंडकर खेळणार राजकारणात दुसरी इनिंग, शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

उल्लेखनिय म्हणजे शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीच्या यादीत उर्मिला यांचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती.

  • Share this:

मुंबई 29 नोव्हेंबर:  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar ) राजकारणातली आपली दुसरी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहेत. उर्मिला या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उल्लेखनिय म्हणजे शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीच्या यादीत उर्मिला यांचं नाव राज्यपालांकडे दिलेलं  आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्विकारली होती.

उर्मिल यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन करून त्यांचं आमदारकीसाठी मन वळवलं होतं.

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे उर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर उर्मिला या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहेत. त्यात आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकरशी चर्चा केल्यानं त्यांनी विधान परिषदेसाठी होकार दिला होता.

मग कोरोना लशीचे बारामतीच्या लॅबमधून वितरण करणार का? चंद्रकांत पाटलांचा टोला

उर्मिला यांची पार्श्वभूमी ही राष्ट्र सेवा दलाची असल्याचं त्यांनी या आधी वारंवार सांगितलं होतं. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी घेतल्याबद्दल आर्श्चर्य ्यक्त केलं जात होतं. अभिनेत्री कंगना राणौतने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर उर्मिला यांनी कंगनावर टीका केली होती. त्याच बरोबर त्यांनी राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवरची जाणही उत्तम आहे.

त्यामुळे उर्मिला या पक्षात आल्यात तर त्याचा फायदा होण्याची शक्यता असल्याने त्यांना शिवसेने घेण्याचा विचार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 29, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading