Home /News /mumbai /

राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत का होत आहे वाढ? आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत का होत आहे वाढ? आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, विभागिय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली.

    मुंबई 19 जून: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन नंतर आता अनलॉकची प्रोसेस सुरू झाली आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे असं सांगितलं जात आहे. मात्र अनेकदा लोक हे नियम पाळत नाहीत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शक्यता आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र जे प्रतिबंधित विभाग आहेत त्याच ठिकाणी हे रुग्ण वाढत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, विभागिय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 विषाणू संसर्ग परिस्थिती संदर्भात आढावा घेण्यात आला. शहरं आणि ग्रामीण भागातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची स्थिती आणि अत्यावश्यक सेवांसंदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे राज्य सरकार तंतोतंत पालन करत असल्यांचंही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय. आणखी काय म्हणाले टोपे? - सर्व्हेलन्स वाढवलं पाहिजे: यावर आजच्या बैठकीत जोर देण्यात आला. इंडेक्स केस धरून किमान 15 लोक संपर्कात आहेत त्यांची ट्रेसिंग आणि होम क्वारंटाईन झालेच पाहिजेत. त्यानंतर लक्षणं बघून टेस्टिंग केले जाईल. - अम्ब्युलनसेसची सेवा कमी पडतेय: ब, क आणि ड वर्गातील महापालिकेत ही समस्या भेडसवतायत. कमीत कमी खर्चात रिकविसजीशन देऊन यासोबत टेस्टिंग, हॉस्पिटल (DCH) पटकन मिळायला हवेत. यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केले पाहिजेत. करोनाच्या संकटात ई-कॉमर्स स्‍टार्टअप देणार 5 हजार नोकऱ्या, महाराष्ट्रातही जॉब्स - डेथ रेट जास्त असलेल्या जिल्ह्यात IMA सोबत लोकल टास्क फोर्स केलेच पाहिजेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. - टेली आयसीयूचा वापर करण्यात येणार आहे : यानुसार रूग्णांना नेमकी कुठल्या उपचाराची गरज आहे ही माहिती डॉक्टरला मिळेल. हे पाच जिल्ह्यात देण्याचे ठरवले आहे. मुंबई, सोलापूर, जळगाव, अकोला, औरंगाबाद आहेत. याशिवाय ठाणे पुणे सारखे जिल्हे वाढवू शकतो. - ड्रग मॅनेजमेंटबाबतीत एक विषय झाला: इमर्जन्सी केसेससाठी Remdesevir हे औषध आपण देतोय. ते उपलब्ध होत नाहीयेत अशी तक्रार होती. मात्र आता ड्रॅग औथोरिटी जनरल यांनी लोकल CIPLA आणि Hetro यांना उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. इमर्जन्सी  ओथोरायझेशन देण्यात आलेले आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये गरज आहे त्यांना देण्याची परवानगी देण्यात येईल. - अँटी-बॉडीज टेस्ट आणि अँटी-जेन टेस्टला ICMR ने परवानगी दिली आहे : सर्व फ्रंटलाईनर्ससाठी आम्ही अँटी बॉडी टेस्टचा वापर केरणार आहोत. यासाठी पॉलिसी निर्णय घेतला जाईल. भाजपने शिवसेनेला पाठिंबा देत सरकार स्थापन करावं, भाजप खासदाराचा प्रस्ताव अँटी जेन रेस्ट डायगणोस्टिक टेस्ट आहे. एका तासात पोजिटिव्ह किंवा नेगवटीव्ह आहे का कळतं. पण त्यापुढे RTPCR कन्फर्मेशनसाठी करावी लागते. यामुळे कामाला वेग मिळू शकेल. प्रायव्हेट लॅबला सुद्धा आम्ही याची परवानगी देणार आहोत. तसेच सरकारी हॉस्पिटल मध्ये हे मोफत करण्याची योजना करत आहोत. - कोविड रिपोर्टसंदर्भात सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे पालनच करू. पण जर असिम्पटोमॅटिक रुग्ण जर बेड्स अडवून ठेवत असेल आणि क्रिटिकल रुग्णांना बेड मिळत नसेल तर हे चुकीचे होईल. सुशांतला 'हेट स्टोरी'साठी साइन केलं होतं पण बालाजीने करू दिला नाही सिनेमा- विवेक आता रुग्णाला रिपोर्ट मिळेलच पण महापालिकेला सुद्धा रिपोर्टची यादी जाणारच आहे. यासाठी बेड मॅनेजमेंटसाठी दररोज सकाळी 6 वाजता महापालिकेला रुग्णांची यादी दिली जाईल. ती 24 वॉर्डस मध्ये पाठवली जाईल. यानुसार बेड लाईन लिस्टची मॅनेजमेंट केले जाईल. या सर्वांसाठी यंत्रणा उभी करत आहोत.    
    First published:

    Tags: Coronavirus, Rajesh tope

    पुढील बातम्या