मुंबई, 5 डिसेंबर : इंटरनेट, मोबाईलच्या युगात पुस्तक वाचनाची आवड कमी झालीय, अशी ओरड नेहमी ऐकू येते. रेल्वे, लोकल, बस, फुटपाथ प्रत्येक ठिकाणी मोकळा वेळ मिळाला की सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. मोबाईलच्या अतिरेकी वापराची सवय ही आरोग्यावर परिणाम करणारी असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ही सवय सुटण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहे. मोबाईलला पुस्तकांचा पर्याय दिला तर ही सवय काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकेल. त्यासाठी पुस्तकं सर्वांना सहज उपलब्ध व्हायला हवीत. ही आवश्यकता ओळखून
मुंबईतील
एका सलुनमध्ये चक्क छोटं ग्रंथालय सुरू करण्यात आलं आहे. काय आहे व्यवस्था? सलूनमध्ये गर्दीच्या वेळी रांगेत असताना अनेकजण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. मुंबईच्या भांडूपमधील दातार कॉलनीमधील रविंद्र बिरारी हे सोशल बार्बर म्हणून प्रसिद्ध आहेत. बिरारी यांच्या हेअर क्राफ्ट जेन्ट्स पार्लरमध्ये चक्क ग्रंथालय आहे. या पार्लरमधील ग्राहक मोबाईलमध्ये नाही तर पुस्तक वाचनात गुंतलेले असतात. बिरारी गेल्या 5 वर्षांपासून इथं ग्रंथालय चालवत आहेत.
सिग्नल लागताच रस्त्यावर का नाचतो ‘हेल्मेट बॉय’? कारण वाचून वाटेल अभिमान, Video
बिरारी यांच्या सलूनमधील ग्राहक डॉ. मनोज चव्हाण यांना ही कल्पना सुचली. तरुण पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी ग्रंथालयाची सुरुवात केली आहे. ग्राहकांना या सलूनमध्ये 100 पेक्षा जास्त पुस्तकं वाचण्याचा पर्याय आहे. सामाजिक राजकीय, आध्यात्मिक, मनोरंजन, कादंबरी या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती बिरारी यांनी दिली.
पुस्तकवेड्या तरुणाची धडपड, लायब्ररी उभी करण्यासाठी करतोय ‘हे’ काम
एखादा ग्राहक प्रतीक्षेत असेल तर बिरारी त्यांना नंबर येईपर्यंत मोबाईलमध्ये वेळ न घालवता पुस्तकं वाचण्याची विनंती करतात. येथील ग्राहकांनाही पुस्तकं वाचण्याची गोडी निर्माण झाली आहे. त्यांनीही या अनोख्या कल्पनेचं कौतुक केलंय.
गुगल मॅपवरून साभार