मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Union Cabinet Expansion : मुंडे कुटुंबाला मोठा धक्का, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाही?

Union Cabinet Expansion : मुंडे कुटुंबाला मोठा धक्का, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाही?

 सुरुवातीपासून माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बहिण डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. पण,

सुरुवातीपासून माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बहिण डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. पण,

सुरुवातीपासून माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बहिण डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. पण,

मुंबई, 07 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet Expansion) विस्ताराला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. महाराष्ट्रातून चार जणांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित झालं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (gopinath munde) यांच्या कन्या प्रीतम मुंडे (pritam munde) यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती. पण, अखेरच्या क्षणी त्यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने हालचालीना वेग आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली त्यानंतर काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर काही जणांनी  शपथविधीचा निरोप देण्यात आला आहे. जालन्याचे खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेऊन मोठा धक्का देण्यात आला आहे.

13 वर्षीय मुलीनं बाळाला दिला जन्म; वर्गमित्रानं ब्लॅकमेल करत केला होता बलात्कार

तर दुसरीकडे सुरुवातीपासून माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बहिण डॉ. प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. पण, ऐनवेळी त्यांचं नाव वगळण्यात आले आहे. ओबीसी नेतृत्व कायम राखण्यासाठी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाईल, असं समिकरण तयार झालं होतं. पण, त्यांच्या ऐवजी मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद दिले जाणार हे निश्चित झाले आहे. भागवत कराड हे वंजारी समाजाचे नेतृत्व करतात. त्यामुळे घराणेशाहीला थारा न देता नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले होते. त्यांची राज्यसभेत खासदार म्हणून निवड झाली आणि आता थेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे, प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदारकीची दुसरी टर्म पूर्ण करत आहे.

महाराष्ट्रातून या नेत्यांना मिळणार मंत्रिपद?

- भागवत कराड

- भारती पवार

- नारायण राणे

- कपिल पाटील

 

दानवे-संजय धोत्रेंचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तर 8 -12 जणांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार आहे. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे.  रावसाहेब दानवे यांचा दोनवेळा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.

अखेर, नव्या मंत्रिमंडळ विस्तारातून दानवेंची पंख छाटण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याही राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी बैठक घेतल्यानंतर मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली आहे.

First published:
top videos