Home /News /mumbai /

'उद्धव ठाकरेंची मास्टर नव्हे लाफ्टरसभा', फडणवीसांचा थेट हिंदीतून पलटवार

'उद्धव ठाकरेंची मास्टर नव्हे लाफ्टरसभा', फडणवीसांचा थेट हिंदीतून पलटवार

कालच्या सभेबाबत आमचे एक मित्र १०० सभांच्या बाप असं म्हणत होते. १०० संख्या ही कौरवांची संख्या, पांडवांसोबत पाच होते. कौरवांची सभा काल तिकडे झाली. आज पांडवांची सभा होत आहे'

    मुंबई, १५ मे - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (cm uddhav thackery) कालच्या सभेला ते मास्टरसभा म्हणत होते. पण भाषण एकल्यावर ती लाफ्टर सभा होती हे लक्षात आलं. काल छत्रपती संभाजी महाराज आणि भगवान नरसिंह यांची देखील जयंती होती. स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापींचे पोट फाटले असे नरसिंह यांची जयंती होती. काहीतरी तेजस्वी ऐकायला मिळेल, असं वाटत होतं. पण लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही' असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (devendra fadanvis speech)  यांनी जशास तसे उत्तर दिले. भारतीय जनता पार्टी मुंबईच्यावतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या संमेलनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले. 'आम्ही ठरवलेलं की, हिंदी भाषिक महासंकल्प सभा होणार. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला ते मास्टरसभा म्हणत होते. पण भाषण एकल्यावर ती लाफ्टर सभा होती हे लक्षात आलं. काल छत्रपती संभाजी महाराज आणि भगवान नरसिंह यांची देखील जयंती होती. स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापींचे पोट फाटले असे नरसिंह यांची जयंती होती. काहीतरी तेजस्वी ऐकायला मिळेल, असं वाटत होतं. पण लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या, नवं असं काही मिळाली नाही. कालच्या सभेबाबत आमचे एक मित्र १०० सभांच्या बाप असं म्हणत होते. १०० संख्या ही कौरवांची संख्या, पांडवांसोबत पाच होते. कौरवांची सभा काल तिकडे झाली. आज पांडवांची सभा होत आहे'असा टोला फडणवीस यांनी लगावला. ('ओठांचं चुंबन, प्रेमाने स्पर्श हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान) मला एक प्रश्न विचारायचा आहे, उत्तर द्या. मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला की नाही? पालघर साधूंची हत्या झाली की नाही? वसूलीच्या आड आलेल्या मन्सुख हिरेन यांची हत्या झाली की नाही? १०० कोटींच्या वसुली प्रकरणी गृहमंत्री जेलमध्ये गेले की नाही? दाऊचा मित्र जेलमध्ये असूनही मंत्रिमंडळात आहे की नाही? आमच्या मजूर भावांना अनवाणी मुंबई सोडावी लागली की नाही? मुंबई मेट्रो, रस्त्याचं काम बंद आहे की नाही? यशवंत जाधवची संपत्ती 35 पासून 53 झाली की नाही? असा सवालही फडणवीसांनी केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या