मुंबई, 06 मार्च : शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह ताब्यातून गेल्यामुळे ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची निवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने आपली नव्याने घटना बनवण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता जोमाने कामाला लागला आहे. पक्षाची नवीन घटना बनवण्याचे काम सुरू केले आहे. नव्या पक्षाची नवीन घटना बनवण्यासाठी ठाकरे गटाकडून कायदेशीर फर्मची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना हा मूळ पक्ष ताब्यातून गेल्यानंतर नव्या पक्षाची घटना तयार करण्याच्या कामाला ठाकरे गटाने सुरुवात केली आहे. जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच अधिकतर गाभा नव्या पक्षाच्या घटनेत असणार आहे. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद नव्या पक्षातही कायम राहणार आहे. तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पक्षाचे सर्वाधिकार राहतील, अशी रचना नव्या घटनेत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे का? सीमावासियांनी संभाजीराजेंना थेट विचारलं) त्यामुळे जुन्यात शिवसेनेच्या घटनेवर ठाकरे गटाची नवीन शिवसेना उभारली जाणार आहे. नव्या शिवसेनेत काय बदल केले जाणार, नवीन पदं कोणती असणार याची माहिती लवकरच दिली जाणार आहे. संजय राऊतांनी दाखवली केराची टोपली दरम्यान, संजय राऊत यांच्या विधानावर सत्ताधारी भाजप आणि शिवेसनेच्या आमदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये आणि सभागृहाबाहेरही गोंधळ घातला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनीही संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला, त्यानंतर संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्यात आला होता. तशी नोटीसही बजावली होती. ( बेळगावमध्ये जाऊन धीरज देशमुख म्हणाले, जय कर्नाटक; नेमकं काय घडलं? ) पण, हक्कभंग नोटीसला संजय राऊतांकडून केराची टोपली दाखवली आहे. विधिमंडळाने ४८ तासांत लेखी म्हणणे मांडण्याची नोटीस दिली होती. पण, संजय राऊतांकडून कोणतेही लेखी उत्तर सादर नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी राऊत यांची खुलासा सादर करण्याची मुदत संपली. त्यामुळे विधिमंडळाच्या राऊतांवरील पुढील कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे. राऊत यांनी लेखी उतर न दिल्यामुळे विधिमंडळाकडून स्मरण पत्र पाठवण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.