जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का? भाजपची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का? भाजपची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का? भाजपची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

या मेळाव्यात सर्वच काही वाईट नव्हतं तर फक्त एकच भाषण प्रभावी झालं आणि ते म्हणजे संजय राऊत यांचं असं सूचक विधानही त्यांनी केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 26 ऑक्टोबर: शिवसेनापक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे OTTचा महा फ्लॉप शो होता. सर्व भाषण म्हणजे जळफळाट होता असा पलटवार भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. थाळ्या वाजवायच्या नाहीत तर घरात बसून अंडी उबवायची का? अशी जहरी टीकाही त्यांनी केली. विजयादशमीच्या दिवशी कुणाला वाईट बोलू नये म्हणून काल प्रतिक्रिया दिली नाही असंही शेलार यांनी म्हटलं आहे. शेलार म्हणाले, कंगनाने वाट लावली त्याचं प्रतिबिंब भाषणात दिसते आहे. भाजपच्या ताकदीचं दडपण उद्धव ठाकरे यांच्यावर दिसत होतं. सरसंघचालकांच्या भाषणाचा ठाकरेंनी विपर्यास केला आहे. संघाचं हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व याची तुलना करू नका. संघाचं हिंदुत्व ही त्वचा आहे, तर शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी पांघरलेली शाल आहे. ती शाल कधीही बाजूला करता येते. हिंम्मत असेल तर सरकार पडून दाखव का म्हणतात. जे कर्माने पडणार आहेत त्यांना धर्माने पडायची गरज नाही. आमचं म्हणणं आहे पहिले घराबाहेर पडून तर दाखवा. टाळ्या आणि थाळ्या वाजवायचा नाहीत तर मग घरात अंडी उबवायची का? अशी जहरी टीका शेलार यांनी केली. 1992मध्ये आम्ही अयोध्येत गेलो होतो तेंव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपला होता असा थेट सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. कोणतीही टेस्ट नाही, तर कुत्रा वासाद्वारे सांगणार तुम्ही पॉझिटिव्ह आहेत की नाही? उद्धव ठाकरे हे तेच ते शब्द सातत्याने वापरतात. फक्त लिहून दिलेलं भाषण वाचून दाखवतात. किमान त्यांनी शब्द तरी नवीन वापरावेत असा टोलाही त्यांनी हाणला. या मेळाव्यात सर्वच काही वाईट नव्हतं तर फक्त एकच भाषण प्रभावी झालं आणि ते म्हणजे संजय राऊत यांचं असं सूचक विधानही त्यांनी केलं. यावेळच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या आधी फक्त संजय राऊत यांचं भाषण झाल्याने त्यांचं पक्षातलं वजन वाढलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी हे विधान केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात