Home /News /mumbai /

धारावीतून कोरोनाची धक्कादायक बातमी, आणखी 2 जणांचा बळी

धारावीतून कोरोनाची धक्कादायक बातमी, आणखी 2 जणांचा बळी

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

मुंबई, 14 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळली आहे. धारावीमध्ये आज आणखी नवे 6 रुग्ण आढळले आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज सकाळी धारावीत नवे 6 रुग्ण आढळले आहे. 4 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णासह धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता  55 वर पोहोचली आहे. हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी मागितली या 7 मुद्यांवर तुमची मदत, एकदा नक्की वाचा! दरम्यान, धारावीतील जवळपास पंधरा हजार लोकांची स्क्रीनिंग केली  म्हणजे तपासणी केली गेली आहे. या 15 हजारातून 90 लोकांचे नमुने घेण्यात आले. त्याच्यामध्ये सर्दी ताप खोकला अशी लक्षणं आढळून आलेले आहेत. अशा 90 लोकांचे आज तपासणी अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 90 जणांपैकी 50 ते 60 जण जर पॉझिटिव्ह झाले तर  धारावीमध्ये कम्युनिटी स्प्रेड अर्थात समूह संसर्ग झाला असं म्हणू शकतो.  जर असा अहवाल आला नाहीतर ही आरोग्य प्रशासनासाठी ही दिलासादायक बाब ठरले. आणि त्यानंतर धारावीमध्ये कोरोना व्हायरस कंट्रोल करण्यात आला असे म्हणता येऊ शकेल. राज्यात  कोरोनाग्रस्तांची संख्या 2334 वर दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे (Covid - 19) 100 जणांचा मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 352 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा -लॉकडाऊनमध्येही थांबेना पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी, CCTVमध्ये कैद झाली चोरी   राज्यात आज वाढ झालेल्या 352 रुग्णांपैकी 242 रुग्ण हे मुंबईतील आहेत. पुण्यातही गेल्या 24 तासांत 39 रुग्ण आढळले आहेत. राज्यात  कोरोना रूग्णांची संख्या कालपर्यंत 1982 इतकी होती ती आज 352 ने वाढून 2334 पर्यंत पोहोचली आहे. मुंबई  242, मालेगाव 14, औरंगाबाद 4, पुणे 39, पिपंरी चिंचवड  6, नागपूर  11, ठाणे  9 आणि वसई विरारमध्ये 5 रुग्ण आढळले आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona, Dharavi

पुढील बातम्या