पुणे, 09 जुलै: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस येत्या 12 जुलैपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) मान्सूनचं (Monsoon) पुनरागमन (Comeback) होणार आहे. बंगालचा उपसागर आणि ओडिशा, पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे. (Maharashtra Rain)
कोकण, गोवा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं (IMD) वर्तवला आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.
हेही वाचा- 'माध्यमांसमोर अनावश्यक विधानं देणं टाळा'; पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना दिले 'हे' महत्त्वाचे सल्ले
दरम्यान दुसरीकडे 9 जुलै रोजी सिंधुदुर्ग, 10 जुलै रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर 11 जुलै रोजी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्या वेगवाग वाऱ्यासह विजांचा कडकडाटह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील मान्सून वापसीला हेच कारण कारणीभूत आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्याच्या किनारपट्टी परिसरात देखील कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होतं आहे. येथून पुढे काही दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीसी कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Mumbai rain, Pune rain, Rain, Weather update