Home /News /mumbai /

West Bengal Result: 'संघर्षाची परिसीमा गाठत यश मिळवलं', राज ठाकरेंनी केलं ममतादीदींचं अभिनंदन

West Bengal Result: 'संघर्षाची परिसीमा गाठत यश मिळवलं', राज ठाकरेंनी केलं ममतादीदींचं अभिनंदन

West Bengal Assembly Election Result 2021 ममता बॅनर्जी यांनी संघर्षाची परिसीमा गाठत नेत्रदीपक यश मिळवल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला.

  मुंबई, 2 मे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पश्चिम बंगालमधील विजयानंतर (West Bengal victory) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचं अभिनंदन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचंही कौतुक राज ठाकरे यांनी केलं आहे. सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमधून राज ठाकरेंनी ममता बॅनर्जी या प्रांतिक अस्मिता (regional identity and pride) असलेल्या राज्यांचा आवाज बनतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. (वाचा-ममता दीदी जखमी वाघिणीसारख्या लढल्या, हा एक ऐतिहासिक विजय : संजय राऊत) राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल दोन्ही राज्यांना कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची परंपरा आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक समानता आहेत. त्यामुळे राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता याचं महत्त्व तुम्ही समजू शकता असंही राज ठाकरे म्हणाले. राज्यांच्या स्वायत्ततेचा तुम्ही आग्रही आवाज बनाल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
  राज ठाकरे यांनी यावेळी तामिळनाडूत मिळवलेल्या विजयाबद्दल स्टॅलिन आणि डीएमके पक्षाचंही अभिनंदन केलं. करुणानिधींप्रणाणे आपणही प्रांतिक अस्मितेला प्राधान्य द्याल असा आशावादही राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.
  (वाचा-....मोदी-शहा हे काही अजिंक्य नेते नाही, संजय राऊतांचा सणसणीत टोला) राज ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांना विजयाच्या शुभेच्छा देताना प्रांतिक अस्मितेच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. प्रादेशिक पक्षांच्या विषयी राज ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा भूमिका मांडली आहे. त्यामुळं या विजयानंतर प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व राज्यांमध्ये आणि पर्यायाने देशात वाढवण्यासाठी या नेत्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Mamata banerjee, Raj Thackeray, West Bengal Election

  पुढील बातम्या