मराठी बातम्या /बातम्या /देश /

"जखमी वाघिणीचा ऐतिहासिक विजय; बंगालच्या वाघिणीचे अभिनंदन करतो"

"जखमी वाघिणीचा ऐतिहासिक विजय; बंगालच्या वाघिणीचे अभिनंदन करतो"

Sanjay Raut congratulate Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनी मिळवलेल्या विजयानंतर संजय राऊत यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

मुंबई, 2 मे: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष लागलेले होते ते म्हणजे पश्चिम बंगालच्या निकालांकडे (West Bengal Assembly Election Result). पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने (BJP) मोठी ताकद लावली होती. पंतप्रधानांपासून ते अमित शहा सर्वच दिग्गज पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी दाखल झाले होते. मात्र, असे असतानाही ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा पराभव करत एकहाती सत्ता मिळवली आहे. ममता दीदींच्या या विजयानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खास आपल्या शैलीत दीदींचं अभिनंदन केलं आहे. जखमी वाघीण एकटली लढली शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, "बंगालच्या वाघिणीचे अभिनंदन करतो. तेथील जनतेने दबावात न येता मतदान करून प्रतिष्ठा कायम राखली. एक स्त्री, जखमी वाघीण एकटी लढली, केंद्राच्या एजन्सीचा दबाव असूनही त्या मागे हटल्या नाहीत. हा एक ऐतिहासिक विजय आहे. दीदींच्या विजयाने देशातील विरोधकांना ऊर्जा मिळालीय. पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी ही ऊर्जा उपयोगी पडेल." बंगालमध्ये ममतादीदीच! आकडा 200 च्या पार, भाजपची घसरगुंडी दादागिरी चालणार नाही हे बंगाल-महाराष्ट्राने दाखवून दिले ममता दीदी एक जमिनीशी जोडलेल्या नेत्या आहेत. तेथील जनतेते ममतांना निवडून दिले आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी कोरोना नियमांचे भंग करून रॅली केल्या. देशाला यांनी कोरोना दिला. दिल्लीतून येवून दादागिरी चालणार नाही, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राने हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात काहीही फरक पडणार नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र भावनात्मकदृष्टया एकच आहेत. ममतादीदींशी बोलणे झाले आणि त्यांचे अभिनंदन केले असं संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपचं बंगालमध्ये पोकळ वादळ होते संजय राऊत यांनी पुढे म्हटलं, "भाजपनं बंगालमध्ये कृत्रिम वादळ निर्माण केले होते, पण ते पोकळ वादळ होते. देशाच्या राजकारणाला दिशा देणारा हा विजय आहे. कोरोनाचा पराभव करण्याऐवजी केंद्र ममतांच्या पराभवासाठी गेले होते. स्त्रीचा पराभव करण्यासाठी दोन दोन महिने पीएम, शहा तळ ठोकतात तेव्हा त्यांनी पराभव स्वीकारावा."
First published:

Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee, Sanjay raut

पुढील बातम्या