Home /News /mumbai /

हा काही पर्स नेण्याचा प्रकार नाही, आम्ही नव्याने फिल्मसिटी उभारतोय, योगींचा ठाकरे सरकारवर पलटवार

हा काही पर्स नेण्याचा प्रकार नाही, आम्ही नव्याने फिल्मसिटी उभारतोय, योगींचा ठाकरे सरकारवर पलटवार

'आम्ही काही कुणाची पर्स उचलून घेऊन जात नाही. ही एक खुली प्रतिस्पर्धा आहे. जो चांगली सुविधा देईल, सुरक्षा देईल, सामाजिक सुरक्षा आणि कुणासोबतही भेदभाव होणार नाही'

    मुंबई, 02 डिसेंबर : मुंबईची ओळख असलेली फिल्मसिटी (filmcity) उत्तर प्रदेशला (uttar pradesh) नेणार या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले होते. अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी आम्ही मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार नसून नव्याने उभारणार आहोत, असा खुलासा केला आहे. तसंच, 'तुम्ही मोठे व्हा आणि मोठा विचार करा', असं म्हणत सेनेचे खासदार संजय राऊत यांना टोलाही लगावला आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत पत्रकार परिषद उत्तर प्रदेशच्या विकास कामाबद्दल आणि फिल्मसिटीबद्दल खुलासा केला आहे. 'उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक उद्योग, धंदे सुरू करण्यात आले आहे. अनेक उद्योजक गुंतवणूक करणार आह. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्मसिटी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. नोएडा परिसरात 1 हजार हेक्टर परिसरात भव्य फिल्मसिटी उभारणार आहोत, असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. रिया चक्रवर्तीच्या भावाला 90 दिवसांनंतर जामीन मंजूर 'कुणी कुणाची काही वस्तू घेऊन जात नाही. मुळात हे काही कुणाची पर्स उचलून नेण्याचा प्रकार नाही. ही एक खुली प्रतिस्पर्धा आहे. जो चांगली सुविधा देईल, सुरक्षा देईल, सामाजिक सुरक्षा  आणि कुणासोबतही इथं भेदभाव होणार नाही, असं वातावरण देईल, अशी ही स्पर्धा आहे. एक भारत आणि श्रेष्ठ भारतासाठी वातावरण देण्याची गरज आहे, त्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. 'मुंबईतील फिल्मसिटी ही मुंबईत काम करेल, उत्तर प्रदेशमध्ये नव्याने फिल्मसिटीची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दिग्गज लोकांशी चर्चा केली. त्यांच्या अनुभवातून चांगली फिल्मसिटी निर्माण होईल. फक्त एका क्षेत्रासाठी नसून संपूर्ण जगात एक मॉडेल निर्माण होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे', असंही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. मुलांकडे लक्ष द्या! खेळता खेळता फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या देवराजचा मृत्यू 'आम्ही कुणाच्याही क्षेत्राला बांधा पोहोचवत नाही, कोणत्याही राज्याचा विकास रोखत नाही. आम्ही भारताची आर्थिक स्थितीला कशी चालना देता येईल, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे कार्य सुरू केले आहे. त्यात उत्तर प्रदेश आपल्याकडून योगदान देत आहे', असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. ' मुळात फिल्मसिटी ही काही वस्तू नाही. फिल्मसिटीबाबत खुली स्पर्धा आहे. आम्ही नव्याने गोष्ट निर्माण करणार आहोत. ज्यांना योग्य वाटत असेल ते नक्की यात सहभागी होतील. तुम्हाला मोठं व्हावं लागणार आहे. मोठा विचार करावा लागणार आहे', असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या