Home /News /mumbai /

मुलांकडे लक्ष द्या! खेळता खेळता फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या देवराजचा दुर्दैवी मृत्यू

मुलांकडे लक्ष द्या! खेळता खेळता फुगा गिळल्यामुळे 4 वर्षांच्या देवराजचा दुर्दैवी मृत्यू

तुम्ही आपल्या लहान मुलांना फुगा खेळायला देत असाल तर सावधान!

मुंबई, 2 डिसेंबर: तुम्ही आपल्या लहान मुलांना फुगा खेळायला देत असाल तर सावधान! खेळता खेळता फुगा गिळल्यामुळे एका 4 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही अंधेरी परिसरात घडली आहे. देवराज सुरज नाग, असं मृत मुलाचं नाव आहे. फुग्यात हवा भरत असताना, हवा भरलेला फुगा देवराजच्या घशात अडकला होता. त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण फुप्फुस तोपर्यंत काम करेनासे झाले होते. श्वास कोंडल्यानं देवराजचा अखेर मृत्यू झाला. हेही वाचा...BHR घोटाळ्याची चौकशी भाजप सरकारच्या आदेशानुसारच, खडसेंनी दरेकरांना सुनावलं मिळालेली माहिती अशी की, आई-वडील रात्री घरात जेवत असताना देवराज आपल्या दोन भावंडासह खेळत होता. फुग्यात हवा भरत असताना हवा भरलेला फुगा देवराजच्या घशात अडकला. ही बाब देवराजच्या आईवडिलांच्या लक्षात आली. त्यांनी त्याच्या फशातील फुगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते निष्फळ ठरले. देवराजच्या वडिलांच्या त्याला खांद्यावर उचलत जवळच असलेल्या हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्याला आधी पटेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण इमर्जन्सी केस म्हणून क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला नानावटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण, तोपर्यंत देवराजचे फुप्फुसांनी काम करणं थांबवलं होतं. नानावटी हॉस्पिटलमध्ये तासभर प्रयत्न करूनही देवराज याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. देवराजचे कुपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळणी देताना काळजी घेणं गरजेचं आहे. आपला मुलगा काय करतो आहे, याकडे पालकांनी लक्ष देणं, महत्त्वाचं आहे. हेही वाचा...नाशिक हादरलं, अपहरण करून 9 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या दरम्यान, नाशिक शहरातील हनुमान चौक परिसरात देखील काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. वीर विनोद जयस्वाल असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे. सकाळी चिमुकला वीर फुग्यासोबत खेळत होता. अचानक त्यानं फुगा गिळला. त्यामुळे त्याचा श्वास रोखला गेला. फुगा गिळल्याचं कळताच वीरच्या वडिलांनी त्याला मुलाला तात्काळ खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, तिथून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनं जयस्वाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या