Home /News /mumbai /

‘ठाकरे हा ब्रँड कोण जपतंय हे साऱ्या जगाला माहीत आहे’ मनसे नेत्याने राऊतांना VIDEOमधून दिलं उत्तर!

‘ठाकरे हा ब्रँड कोण जपतंय हे साऱ्या जगाला माहीत आहे’ मनसे नेत्याने राऊतांना VIDEOमधून दिलं उत्तर!

शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर हा VIDEO पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली साम्यस्थळं दाखवली आहेत.

    मुंबई 13 सप्टेंबर: शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रविवारी रोखठोकमधून ठाकरे ब्रँड बद्दल मत व्यक्त केलं होतं. महाराष्ट्रासाठी हा ब्रँड महत्त्वाचा आहे. राज ठाकरे हे सुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल' अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली होती. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी एका VIDEOच्या माध्यमातून राऊतांना उत्तर दिलं आहे. ठाकरे हा ब्रँड कोण जपतंय हे साऱ्या जगाला माहीत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर हा VIDEO पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली साम्यस्थळं दाखवली आहेत. त्यातून राज ठाकरे हेच बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत असं त्यांनी सूचवलं आहे. व्यंगचित्रकार, गर्दी खेचणारा नेता आणि प्राण्यांवर प्रेम गुण विशेष  बाळासाहेब आणि राज ठाकरे या दोघांमध्येही आहे असं व्हिडीओत दाखविण्यात आलं आहे. काय म्हणाले राऊत? शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही चिंता व्यक्त केली. कंगना विषय आमच्यासाठी बंद, मात्र प्रत्येक गोष्टींवर आमची नजर; राऊतांचा इशारा ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल' अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका,आंदोलन न करण्याचे केले आवाहन तसंच, 'मुंबईला पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय राजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्य़ांना शोभणारे नाही.' असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Raj Thackeray

    पुढील बातम्या