मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /त्याच्या मोबाईल चोरीमुळे 3 महिन्याचे बाळ झाले पोरके, मुंबईतील मन हेलावून टाकणारी घटना

त्याच्या मोबाईल चोरीमुळे 3 महिन्याचे बाळ झाले पोरके, मुंबईतील मन हेलावून टाकणारी घटना

रेल्वे गाडी कळवा रेल्वे स्थानकावर पोहोचताच एका तरुणाने महिला प्रवाशांच्या डब्यात प्रवेश केला.

रेल्वे गाडी कळवा रेल्वे स्थानकावर पोहोचताच एका तरुणाने महिला प्रवाशांच्या डब्यात प्रवेश केला.

रेल्वे गाडी कळवा रेल्वे स्थानकावर पोहोचताच एका तरुणाने महिला प्रवाशांच्या डब्यात प्रवेश केला.

डोंबिवली, 01 जून : लोकलमध्ये (Mumbai Local) चोरांसोबत झटापटीदरम्यान लोकलमधून पडून डोंबिवलीत (Dombivali) राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचा धक्कादायक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, बाळाला जन्म दिल्यानंतर नोकरीवर रूजू होण्याचा पहिलाच दिवशी त्यांच्यासोबत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या पाटील (Vidaya Patil) असं या महिलेचं नाव आहे. त्या डोंबिवलीतील राहत होत्या. अंधेरी येथे खाजगी कंपनीत कामाला असलेल्या विद्या पाटील या नुकत्याच बाळांतीन झाल्या होत्या. बाळंतपणानंतर आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घरी वडिलांकडे सोडून विद्या पाटील या कामाला जात होत्या.  चार दिवसांपूर्वी त्या कामावरून घरी परत येत असताना कुर्ला रेल्वे स्थानकावरून त्यांनी डोंबिवली च्या दिशेने जाणारी रेल्वे गाडी पकडली. त्यावेळेस महिला डब्यात चार ते पाच महिला प्रवासी होत्या.

सोन्याचांदीच्या दरात मोठी उसळी, सोनं 50 हजारांच्या जवळपास तर चांदी 72 हजारांवर

रेल्वे गाडी कळवा रेल्वे स्थानकावर पोहोचताच एका तरुणाने महिला प्रवाशांच्या डब्यात प्रवेश केला. त्याने विद्या पाटील यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस विद्या पाटील यांनी प्रतिकार केला. अगदी 15 ते 30 सेकंदाच्या दरम्यान ही झटापट दोघांमध्ये सुरू असताना मोबाईल खेचून चोर गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना विद्या पाटील यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळेस त्याने जोराने विद्या पाटील यांना धक्का दिला आणि धावत्या रेल्वेगाडीतून विद्या पाटील खाली पडल्या रेल्वे ट्रॅकवर पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दिसणारा चोर हा सराईत गुन्हेगार असून याआधी देखील त्याने अशा प्रकारे रेल्वेत चोरी केलेले आहेत. हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी फैजल शेख नावाच्या 31 वर्षे तरुणाला मुंबईतून अटक केली. धक्कादायक म्हणजे, फैजल शेखवर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे असून देखील फैजलची पुन्हा रेल्वेत येऊन चोरी करण्याची हिंमत करतो कशी, असा सवाल निर्माण झाला.

'मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचं थेट सवाल

खरंतर रेल्वे प्रवास करताना महिला डब्यात सदैव विशेष करून संध्याकाळी सहानंतर जीआरपी किंवा आरपीएफ दलाचे महिला किंवा पुरुष जवान असणे हे बंधनकारक असते. असं असतानाही विद्या पाटील ज्या महिला प्रवासी डब्यातून प्रवास करत होत्या. त्या महिला प्रवासी डब्यात जीआरपी किंवा आरपीएफचा जवान का नव्हता, असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai