राज्यातल्या Active रुग्णांची संख्या गेली 1 लाखांच्यावर, आजही 7827 नवे रुग्ण

Navi Mumbai: A medic screens a labourer at APMC fruit market during the ongoing COVID-19 lockdown, in Navi Mumbai, Sunday, May 3, 2020. (PTI Photo)(PTI03-05-2020_000212B)

मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 92988 एवढी झालीय. तर 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5288 एवढी झाली आहे.

  • Share this:
    मुंबई 12 जुलै: राज्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. (Maharashtra Coronavirus patient ) चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज Active रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा ट्प्पा पार केला. आज नवे 7827 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या 254427 एवढी झाली आहे. तर Active रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 516 एवढी झाली आहे. आज 3340 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या 10289 एवढी झाली आहे. मुंबईत 1243 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या (Mumbai Coronavirus patient) 92988 एवढी झालीय. तर 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5288 एवढी झाली आहे. राज्यात 31904 टेस्ट करण्यात आल्यात त्यात 7827 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान,  राजभवनातले कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोना चाचणी केली आहे. या चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला आहे. राजभवानानेच ही माहिती दिली आहे. आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. अमेरिकेतील नव्या व्हिसा नियमांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना फटका; परतण्याची भीती करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो अशी माहितीही राज्यपालांनी दिली आहे. राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आले आहे. यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अभिषेक बच्चनने रुग्णालय सोडलं? सोशल मीडियावरील व्हायरल VIDEO मुळे चिंता वाढली यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप 45 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: