अमेरिकेतील नव्या व्हिसा नियमांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना फटका; परतण्याची भीती

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षण संस्थांना मोठा फटका सहन करावा लागत आहे

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षण संस्थांना मोठा फटका सहन करावा लागत आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 जुलै : जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यात अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे.  अमेरिकेत व्हिसासंदर्भात नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. तेव्हापासून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक पेचप्रसंगाच्या काळात निर्वासित होण्याची आणि कर्जाची परतफेड करणे, कोविड -19 चा धोका, सेमिस्टरचा अभ्यास सुटणे आणि पुन्हा कॉलेजमध्ये जाता न येण्याची भीती सतावत आहे. व्हिसा नियम यूएस इमिग्रेशन ऑथोरिटीने जाहीर केले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे परदेशी विद्यार्थ्यांना देशामधून बाहेर पडावे लागेल किंवा निर्वासित होण्याच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. ज्या  विद्यापीठांनी या सेमिस्टरमध्ये पूर्णवेळ ऑनलाईन वर्ग आयोजित केला आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू केला जाऊ शकतो. यामुळे शेकडो भारतीय विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो. हे वाचा-‘कसौटी जिंदगी..’ मालिकेतील मुख्य अभिनेत्यालाही कोरोना; मुंबईतील शूटिंग थांबवलं आदेश रोखण्यासाठी याचिका दाखल हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी या आदेशावर स्थगिती मागितली आहे. ज्यास प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॉर्नेल विद्यापीठ यासह काही विद्यापीठांनी पाठिंबा दर्शविला आहे. उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड हेल यांच्या भेटीत हा मुद्दा उपस्थित झाला. या आठवड्याच्या सुरूवातीला अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड हेल यांच्याशी झालेल्या ऑनलाइन बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी शैक्षणिक देवाणघेवाण आणि दोन्ही देशांमधील लोकांशी संपर्क साधण्याची भूमिका लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published: