अभिषेक बच्चनने रुग्णालय सोडलं? सोशल मीडियावरील व्हायरल VIDEO मुळे चिंता वाढली

अभिषेक बच्चनने रुग्णालय सोडलं? सोशल मीडियावरील व्हायरल VIDEO मुळे चिंता वाढली

काल अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : अभिनेता अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना काल नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज एक व्हिडीओ समोर आला आहे. यानुसार त्यांनी नानावटी रुग्णालय सोडलं असून ते घरीच क्वारंटाईन होणार असल्याचे सांगितले जात आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांना सौम्य लक्षणे दिसत असून त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

viralbhayani याने सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये जलसातून नानावटीला एक गाडी गेल्याचे दिसत आहे. यामध्ये viralbhayani नुसार अभिषेक बच्चन जलसा सोडून त्यांच्या प्रतिक्षा या बंगल्यात गेले आहेत. अद्याप याबाबत नेमकी बातमी हाती लागलेली नाही.

नानावटी हाॅस्पिटल प्रशासनानुसार अद्याप अभिषेक बच्चन यांना डिस्चार्ज दिलेला नाही, डिसचार्ज दिल्याच्या अफवा आहे.

दरम्यान टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथान हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकांच्या शूटिंगला काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. बालाजी प्रॉडक्शन कसौटी जिंदगी की 2 मध्ये तुम्ही त्याला पाहू शकता. शोमध्ये तो अनुरागची भूमिका साकारत आहे. आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार क्लिक निक्सोन स्टुडिओतील शूटिंग थांबविण्यात आले आहे. आणि शो स्टार कास्ट आणि क्रू यांना वेळापत्रकानुसार बीएमसीकडे येण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनासाठी सर्व सदस्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: July 12, 2020, 6:06 PM IST

ताज्या बातम्या