मुंबई, 16 जून : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. या परिस्थितीत भाजपने एकापाठोपाठ आरोप करून महाविकास आघाडी सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आता महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे.
उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शुभारंभ करण्यात आला. फडणवीस सरकारच्या काळातही मॅग्नेटीक महाराष्ट्र असा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी कोट्यवधीची गुंतवणूक करण्यात आली होती, असा दावा करण्यात आला होता.
पंरतु, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यावेळी अशा अनेक कंपन्या समोर आल्या होत्या. पण, त्यानंतर कोणत्याही कंपनीने गुंतवणूक केली नाही. त्यामुळे याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती दिली.
155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेतील तब्बल सव्वा लाख नागरिकांना दिला रोजगार
फडणवीस सरकारच्या काळात मेक इन इंडिया आणि मॅग्नेटीक महाराष्ट्र असा मिळून संयुक्त कार्यक्रम घेण्यात आाला होता. त्यावेळी फडणवीस यांच्या उपस्थितीत जे काही करार झाले होते, त्या कराराचा फेरआढावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.
फडणवीस सरकारच्या काळात जे करार झाले होते ते औद्योगिक मेळावे, परिषद आणि मोठ्या कार्यक्रमात झाले होते. त्यावेळी अशी परिस्थिती होती की, कंपन्या या समोर येतात आणि कंपन्या स्थापन करण्यासाठी करार करण्याची माहिती देतात. त्यामुळे ती कंपनी नेमकी कोणती, काय करणार आहे याची छानणी करण्यास वेळ मिळत नाही. तसंच समोरून येणाऱ्या कंपन्यांवर गैरविश्वासही दाखवता येत नाही. पण त्यानंतर झाले असे की, त्या करारांची पूर्तता होत नाही, अशी बाबसमोर आली. काही उद्योग स्थापन झाले, काही झाले नाही. काही कंपन्या या मंदीमध्ये अडकल्या त्यामुळे त्या पुढे आल्याच नाही, अशी माहितीही देसाईंनी दिली.
पुणे शहरासाठी मोठी बातमी, अजित पवारांनी दिले महत्त्वाचे आदेश
त्यामुळे, फडणवीस सरकारच्या काळात मेक इन इंडियात 8 लाख कोटी रुपयांचे करार झाले होते. या करारामधील कंपन्या गुंतवणूक करत नसल्याचं समोर आहे. नक्की गुंतवणूक करणार होत्या का? याचाही आढावा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे सोळा हजार कोटी रुपयांचे तर नजीकच्या भविष्यकाळात आठ हजार कोटींचे सामजंस्य करार करण्यात येणार आहेत.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Subhash desai