• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • बायको परत ये, नवऱ्याने मुलाला तिरडीवर झोपवले अन् मुलीला सांगितले गळफास घ्यायला पण...

बायको परत ये, नवऱ्याने मुलाला तिरडीवर झोपवले अन् मुलीला सांगितले गळफास घ्यायला पण...

पण त्याच्या या कारणामुळे त्याच्या मुलीचा जीव गेला असता. कारण बायकोला भावनिकरित्या घरी बोलण्याच्या नादात

पण त्याच्या या कारणामुळे त्याच्या मुलीचा जीव गेला असता. कारण बायकोला भावनिकरित्या घरी बोलण्याच्या नादात

पण त्याच्या या कारणामुळे त्याच्या मुलीचा जीव गेला असता. कारण बायकोला भावनिकरित्या घरी बोलण्याच्या नादात ...

  • Share this:
मुंबई, 10 ऑगस्ट : बायकोची (wife) मनधरणी करण्यासाठी कोण काय पाऊल उचलेले याचा नेम नाही. कुरार पोलीस स्टेशनच्या (Kurar Police Station) हद्दीमध्ये एका नवऱ्याने मुलाला तिरडीवर झोपवून मृत झाल्याचा बनाव केला तर मुलीला गळफास देण्याचा प्रयत्न केला. पण, वेळीच शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय गौडा असं या माथेफिरूचं नाव आहे. कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारच्या सकाळी अजयने आपल्या मुलाला तिरडी बनवून त्याच्यावर झोपवून पांढरी चादर टाकून हार फुल टाकली आणि त्या तिरडीचे बाजूला अगरबत्ती लावून असा बनाव केला की त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. तर दुसरीकडे घरात आपल्या मुलीला लटकवून तिचे फोटो काढून आपल्या मुलीने आत्महत्या केलेली आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता. महाराष्ट्र हादरला! लग्नाच्या 100 व्या दिवशी तरुणीने केली आत्महत्या पण त्याच्या या कारणामुळे त्याच्या मुलीचा जीव गेला असता. कारण बायकोला भावनिकरित्या घरी बोलण्याच्या नादात अजय गौड हा मुलीला फाशी घ्यायला सांगत होता, पण आपल्याला मरायचं नाहीये आपल्याला जगायचं असं सांगून अजय गौडची मुलगी मोठमोठ्याने रडत होती. मुलीचा आवाज शेजारांनी ऐकला आणि धाव घेऊन सुटका केली.  त्यामुळे मुलीचा जीव वाचला. घडलेला प्रकार लोकांनी पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अजय गौडला अटक केली. अजय गौड हा सतत नशेत असतो, नशा करून पत्नी आणि मुलांना बेदम मारहाण करत असायचा. याच जाचाला कंटाळून अजयच्या पत्नीने काही महिन्यांपूर्वी त्याचे घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. ती परत यावी याकरता अजयने आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूचा कट रचला होता. सुरुवातीला फक्त फोटो काढून पत्नीला पाठवायचे आहेत, असं ठरवणाऱ्या आरोपी अजय गौडने आपल्या मुलीला फाशी घ्यायला सांगितली, त्याच वेळेस हा सगळा प्रकार समोर आला. वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले थक्क अजय गौड दारूच्या नशेत अनेकदा आपल्या पत्नीला खूप मारहाण करत  होता आणि याच कारणामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. अजय गौडचा अत्याचार इतक्या शिगेला पोहोचला होता की, त्याच्या मारहाणीमुळे त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली होती. घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असून कुरार पोलिसांनी अजयला अटक केली असून तो सध्या कुरार पोलिसांच्या ताब्यात आहे.
Published by:sachin Salve
First published: