Home /News /mumbai /

धारावीत कोरोनाचं थैमान, रूग्णांच्या संख्येनं ओलांडला धक्कादायक टप्पा

धारावीत कोरोनाचं थैमान, रूग्णांच्या संख्येनं ओलांडला धक्कादायक टप्पा

मुंबईत गेल्या सात दिवसांत कोरोनाव्हारसची नवीन प्रकरणं दररोज सरासरी 5.17 टक्क्यांनी वाढत आहेत. माहीम, धारावी आणि दादर परिसरात तब्बल 2,728 कोरोना रुग्ण आहेत.

मुंबई 28 मे: मुंबईतल्या रूग्णांच्या संख्येनं ओलांडला ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईत एक हजरांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. दिवसाला २ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. धारावी आज नवीन ३६ रूग्ण पाॅझिटीव्ह आढळले. आता पर्यंत धारावीत १६७५ एकुण रू्गण पाॅझिटीव्ह आहेत. मुंबईत 70 सार्वजनिक रूग्णालयं 20हजार 700 बेडची सार्वजनिक रूग्णालयांची क्षमता. मुंबईत 1 हजार 500 खासगी रुग्णालयं. 1हजार 500 बेडची खासगी रूग्णालयांची क्षमता आहे. म्हणजेच 3000 लोकांमागे 1 बेड. नियमांप्रमाणे 550 रूग्णांमागे 1 बेड असायला हवा. राज्य सरकारकडून आपत्कालीन हॉस्पिटलची निर्मिती. नव्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि स्टाफची कमतरता आहे. लोकसंख्येच्या घनतेमुळेच संकट वाढल्याचं म्हटलं जातं. मुंबईत  एका चौरस किलोमीटरमध्ये 10 लाख लोकसंख्या आहे. न्यूयाॅर्कच्या मॅनहॅटनच्या तुलनेत 10 पट जास्त घनता आहे. 50 जणांमध्ये एक सार्वजनिक शौच्चालय आहेत. 10 फुटांच्या रूममध्ये 10 ते 12 लोकांचं वास्तव्य आहे.  फिजिकल डिस्टन्स पाळणं अशक्य आहे. त्यामुळे कशा उपाय योजना करायच्या असा प्रश्न सरकारला पडलाय. लस तयार करण्यासाठी 10 वर्षे लागतात, सरकारकडून एका वर्षांत तयार करण्याचा प्रयत्न देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण (corona patient) महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत (mumbai) आहेत. बुधवारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 835 वर पोहोचली. मुंबईतील वॉर्डचा (ward) विचार करता सर्वाधिक कोरोना रुग्ण जी-उत्तर वॉर्डमध्ये आहेत. हा वॉर्ड म्हणजे धारावीचा परिसर. चालत्या ट्रकनं घेतला पेट तरी ड्रायव्हर थांबला नाही, पुढे गेला आणि... मुंबईत गेल्या सात दिवसांत कोरोनाव्हारसची नवीन प्रकरणं दररोज सरासरी 5.17 टक्क्यांनी वाढत आहेत. माहीम, धारावी आणि दादर परिसरात तब्बल 2,728 कोरोना रुग्ण आहेत. धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे. तर आर उत्तर म्हणजे दहिसर क्षेत्रात सर्वात कमी 309 कोरोना रुग्णांची नोंद आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या