ठाणे, 11 ऑगस्ट : प्लायवूडचा ढिग अंगावर कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ठाण्यातील शिळफाटा परिसरात गोडाऊनमध्ये ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 9 च्या सुमारास शेजारी असणारा कुत्रा या गोडाऊनमध्ये शिरला. कुत्रा भटकत असताना अचानक त्यानं उडी मारली आणि मोठा आवाज झाला. त्याच्या एका उडीमुळे तिथे असलेला प्लायवूडचा ढिगारा खाली कोसळला. प्लायवूड पडल्यानं आवाज झाला त्यामुळे नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी शेजारी आणि कुटुंबीय तिथे आले. हे वाचा- कोव्हिड सेंटरमध्ये जागाच नाही, 72 वर्षीय आजोबा मोजत आहेत अखेरच्या घटका त्यांनी प्लायवूडचा ढिगारा हटवल्यानंतर दोन मुली बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. या मुलींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत दोन सख्ख्या बहिणींनी प्राण सोडले होते. 11 वर्षांची रंजू आणि 9 वर्षांच्या मंजू अशी या दोन बहिणींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 8 भावंडं आहेत. तर शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार छाती आणि डोक्यावर प्लायवूडचा ढिगारा पडल्यानं गंभीर जखम झाली होती. या दोन बहिणींना कळव्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या या प्रकऱणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.