जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! कोव्हिड सेंटरमध्ये जागाच नसल्याने 72 वर्षीय आजोबा मोजत आहेत अखेरच्या घटका

धक्कादायक! कोव्हिड सेंटरमध्ये जागाच नसल्याने 72 वर्षीय आजोबा मोजत आहेत अखेरच्या घटका

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

उपचार घेण्यासाठी जागाच नसल्याने 72 वर्षीय आजोबा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

किरण मोहिते, सातारा, 10 ऑगस्ट : महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आणखी गडद होत असतानाच साताऱ्यातून एक संतापजनक माहिती समोर आली आहे. कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी जागाच नसल्याने 72 वर्षीय आजोबा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काल एक महत्वाची बैठक कराड येथे पार पडली. यावेळी सातारा जिल्ह्यातील कोव्हीड सेंटरच्या दुरावस्थेबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरित अशा संदर्भात कारवाईचे आदेश दिले. तसेच कराडमधील कोव्हिड सेंटरमध्ये तात्काळ उपाचार उपलब्ध होत असल्याचे सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या या सूचनेला 24 तासही झाले नसताना कराडमधील या कोव्हिड सेंटरमध्ये एका 72 वर्षीय कोव्हिडबाधित पुरुषाला दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्याची तातडीची गरज असताना त्यांचे नातेवाईक या आजोबांना घेऊन सरकारी रुग्णलयातही गेले. तेथेही तीच परिस्थिती आहे. त्यांना कराडच्या एरंम हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करून घेतले जात नाही. याविषयी त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही ते या 72 वर्षीय वृद्धाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचंच चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात