मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

CM एकनाथ शिंदेची ठाणेकरांना पहिली भेट! 1 ऑगस्ट पासून मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

CM एकनाथ शिंदेची ठाणेकरांना पहिली भेट! 1 ऑगस्ट पासून मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

CM एकनाथ शिंदेची ठाणेकरांना पहिली भेट! 1 ऑगस्ट पासून मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

CM एकनाथ शिंदेची ठाणेकरांना पहिली भेट! 1 ऑगस्ट पासून मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

Extra Water Benefit to Thane: 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा (Water Supply in Thane) करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 20 जुलै: 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा (Water Supply in Thane) करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  दरम्यान एकनाथ शिंदेंनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाणेकरांसाठी ही खास भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या पुढाकारानं जलसंपदा विभागानं घेतलेल्या या निर्णयामुळं ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला दिले होते. यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने अतिरिक्त 50 एमएलडी पाणी देण्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे ठाणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे शहराचा वेगानं विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipal Corporation) मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून अतिरिक्त पाणी मिळाल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिकेलाही पाण्याचं व्यवस्थापन करणं सोपं जाणार आहे.

हेही वाचा: Indian Railways: रेल्वेचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का; भाडेदरात सवलत मिळणं बंद

ठाणे शहराला दररोज 485 दशलक्ष मिलीलिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा जलाशयाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणं शक्य होत असल्यानं आता ठाणे शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ठाणे   महानगरपालिकेनं मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाकडे केली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांसाठी 50 एमएलडी अतिरिक्त पाणी तातडीने देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते.

त्यानुसार ठाणे शहराची तातडीची गरज भागवण्यासाठी जलसंपदा विभागाने 50 एमएलडी पाणी येत्या 1 ऑगस्ट पासून ठाणे शहराला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदग्रहण केल्यानंतर शहराला पहिली मोठी भेट मिळाली आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Thane municipal corporation, Water, Water crisis