ठाणे, 10 फेब्रुवारी : वाढतं वजन ही समस्या अनेकांना भेडसावत असते. त्यासाठी वेगवेगळे उपाय लोकांकडून केले जातात. काहीजण गोळ्याही घेतात. अशाच गोळ्या घेणं 22 वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. वजन कमी करण्याच्या गोळ्या खाल्ल्यानंतर काही तासात ठाण्यातील तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेघना देवगड़कर असं त्या मुलीचे नाव आहे. ती डान्सर आणि एक जीम ट्रेनरसुद्धा होती. वजन कमी करण्यासाठी तिने ज्या गोळ्या घेतल्या त्यावर बंदी होती असं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेघनाने जीममध्ये जाण्याआधी गोळ्या घेतल्या. ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या मेघनाला त्यानंतर थोड्याच वेळात उलट्या सुरू झाल्या. तिथून मेघनाला थेट डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयात तिला थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी मेघनाचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचं सांगितलं. गोळ्या घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आतच मेघनाचा मृत्यू झाला.
मेघनाने गोळ्या घेतल्यानंतर तिला हायपरथरमियाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिच्या शरीराचं तापमान अचानक वाढायला लागलं. त्याचबरोबर रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही वाढल्याचं डॉक्टरांनी म्हटले.
आई-बापाविरोधात मुलगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, तिथेच आईने घेतले पेटवून!
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अशी नोदं केली आहे. तसेच एफडीएला अहवाह पाठवला आहे. आता मेघनाकडे गोळ्या कुठून आल्या. बंदी असलेल्या गोळ्या कुठं मिळाल्या याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुलीच्या लग्नामुळे होते अस्वस्थ; वडील,आई आणि भावाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane