मुलींच्या लग्नामुळे होते अस्वस्थ; वडील, आई आणि भावाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन!

मुलींच्या लग्नामुळे होते अस्वस्थ; वडील, आई आणि भावाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन!

वरगंटीवार कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

गडचिरोली, 10 फेब्रुवारी :गडचिरोली शहरात  आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथे सोमवारी दुपारी घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

रवींद्र वरगंटीवार यांचे  कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होतं. रवींद्र नागोराव वरगंटीवार ( वडील),  वैशाली रवींद्र वरगंटीवार( आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार ( मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाच्या विषयावरुन अस्वस्थ असलेल्या कुटुबीयांची अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तिथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली.

तिघांनीही आत्महत्येपूर्वी विहिरीबाहेर मोबाईल आणि चप्पला काढून ठेवल्या होत्या. विहिरीच्या काठावर मोबाईल आढळून आल्यामुळे तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली.  ही माहिती शहरात पसरतात अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. आत्महत्येचं कारण स्पष्ट नसलं तरी मुलीच्या आंतरजातीय लग्नातूनच तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चा शहरात आहे. कुणीही या विषयावर कॅमेऱ्यात बोलायला तयार नाही. या ह्रदयद्रावक घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

'प्रेम की गंगा बहाते चलो...' मुस्लीम मुलीच्या लग्नाचं हिंदू कुटुंबीयांनी दिलं आमंत्रण

दरम्यान, रतलाममधल्या हाथीखाना परिसरात एका हिंदू महिलेने मुस्लीम तरुणीच्या लग्नाआधी सगळ्यांना भोजन दिलं आणि धार्मिक सलोख्याचा एक अनोखा आदर्श घालून दिला. हाथीखाना मधल्या रहिवासी सज्जन कुंवर यांनी सगळ्यांना लग्नघराच्या भोजनाचं आमंत्रण दिलं. सज्जन कुंवर यांच्या शेजारी युसूफ खान राहतात. युसूफ खान यांना 3 मुलं आणि एक साजेदा बी नावाची एक मुलगी आहे. हे भाऊबहीण लहानपणापासूनच सज्जन कुंवर यांच्या मुलांशी खेळायला यायचे. सज्जन कुंवर यांनी साजेदावर आईसारखं प्रेम केलं आणि साजेदाचंही त्यांच्याशी असंच नातं आहे.

प्रेमाने केलं लहानाचं मोठं

साजेदाचे वडील अन्सार खान सांगतात, सज्जन कुवर यांनी साजेदाला अगदी यशोदेच्या मायेने मोठं केलं आहे. साजेदाला जाहिदा यांनी जन्म दिला पण सज्जन कुंवर यांनीच तिला मोठं केलं. यामुळेच साजेदाच्या लग्नाला आलेल्यांचा पाहुणचार सज्जन कुंवर यांनी मोठ्या मायेने केला.सज्जन कुंवर यांनी 400 पेक्षा जास्त पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं. यामध्ये सगळ्या जाती-धर्माचे लोक सहभागी झाले होते. सजन कुंवर यांनी याचा सगळा खर्च केला. इथे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं.

साजेदाला निरोप देताना...

सज्जन कुंवर सांगतात,  साजेदा बी 3 वर्षांपूर्वी इंदौरला उर्दू आणि कुराणचं शिक्षण घेण्यासाठी गेली होती. ती तिथे दीड वर्षं राहिली. तिला डाळभात खूप आवडायचा. जेव्हाजेव्हा घरात डाळभात बनत असे तेव्हातेव्हा सज्जन कुंवर यांना साजेदाची आठवण यायची. त्यामुळे मग त्यांनी डाळभात करणं सोडून दिलं. साजेदा पुन्हा रतलामला आली तेव्हा त्यांनी तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले.

 

First published: February 10, 2020, 5:46 PM IST
Tags: gadchiroli

ताज्या बातम्या