मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आई-बापाविरोधात मुलगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, तिथेच आईने रॉकेल टाकून घेतले पेटवून!

आई-बापाविरोधात मुलगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, तिथेच आईने रॉकेल टाकून घेतले पेटवून!

 या घटनेनं पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनं पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनं पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  sachin Salve

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 10 फेब्रुवारी : वर्धा इथं हिंगणघाटमध्ये  प्राध्यापिका तरुणीची मृत्यूशी झुंज आज संपवली. तिच्यावर अंत्यसंस्कार पार पडत नाही तेच आणखी एका महिलेनं  पोलीस स्टेशनच्या आवारातच पेटवून घेतल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

कौटुंबिक वादातून या महिलेनं स्वत: ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गेटवरच ही घटना घडली. हरजितकौर संधू (वय 45) असं या महिलेचं नाव आहे.

मुलगी आणि आईमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडिलांविरोधातच मुलगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती.

त्यामुळे संतापलेल्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात रॉकेल ओतून पेटवून घेतलंय. या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेनं पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलींच्या लग्नामुळे होते अस्वस्थ; वडील, आई आणि भावाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन!

दरम्यान, गडचिरोली शहरात  आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथे सोमवारी दुपारी घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

रवींद्र वरगंटीवार यांचे  कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होतं. रवींद्र नागोराव वरगंटीवार ( वडील),  वैशाली रवींद्र वरगंटीवार( आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार ( मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाच्या विषयावरुन अस्वस्थ असलेल्या कुटुबीयांची अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तिथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली.

तिघांनीही आत्महत्येपूर्वी विहिरीबाहेर मोबाईल आणि चप्पला काढून ठेवल्या होत्या. विहिरीच्या काठावर मोबाईल आढळून आल्यामुळे तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली.  ही माहिती शहरात पसरतात अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. आत्महत्येचं कारण स्पष्ट नसलं तरी मुलीच्या आंतरजातीय लग्नातूनच तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चा शहरात आहे. कुणीही या विषयावर कॅमेऱ्यात बोलायला तयार नाही. या ह्रदयद्रावक घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

First published:

Tags: Nashik, Panchavati