जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीर सिंगसुद्धा आहे कास्टिंग काऊचचा बळी; सांगितला धक्कादायक अनुभव

रणवीर सिंगसुद्धा आहे कास्टिंग काऊचचा बळी; सांगितला धक्कादायक अनुभव

रणवीर सिंगसुद्धा आहे कास्टिंग काऊचचा बळी; सांगितला धक्कादायक अनुभव

बॉलीवूडमधील फिमेल कलाकारचं नव्हे तर मेल कलाकारसुद्धा कास्टिंग काऊचंला(Casting Couch) बळी पडतात. असा धक्कादायक खुलासा रणवीर सिंगने केला होता. याबद्दल बोलताना त्याने आपण स्वतः कास्टिंग काऊचला सामोरं गेल्याचं उघड केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 एप्रिल-  बॉलीवूडमध्ये एक हरहुन्नरी कलाकार(Bollywood Actor)  म्हणून अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)  कडे बघितलं जातं. अवघ्या कमी वेळात रणवीरने बॉलीवूडमध्ये आपला चांगला दबदबा निर्माण केला आहे. मात्र या यशस्वी अभिनेत्याला सुद्धा आपल्या सुरुवातीच्या काळात काही वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. बॉलीवूडमधील फिमेल कलाकारचं नव्हे तर मेल कलाकारसुद्धा कास्टिंग काऊचंला(Casting Couch)  बळी पडतात. असा धक्कादायक खुलासा रणवीर सिंगने केला होता. याबद्दल बोलताना त्याने आपण स्वतः कास्टिंग काऊचला सामोरं गेल्याचं उघड केलं आहे. एनडीटीव्ही या वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणवीर सिंगने कास्टिंग काऊच बद्दल सपष्टपणे प्रतिक्रिया दिली होती. यावेळी बोलताना रणवीर सिंग म्हणाला होता. ‘कामानिमित्त मी एका व्यक्तीला भेटणार होतो. आमची भेटही ठरली होती. त्यानुसार मी आवश्यक असणारी माझी प्रोफाईल तयार करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे आमची भेट झाली. आम्ही ज्यावेळी संवाद साधत होतो. त्यावेळी मी भेटायला गेलेल्या व्यक्तीने माझ्या प्रोफाईल कडे अजिबात पाहिलं नाही. मी अगदी सूटसुटीत हवी तशी प्रोफाईल तयार केली होती. मात्र त्या व्यक्तीला त्यामध्ये थोडासाही रस नव्हता.

जाहिरात

त्या व्यक्तीने मला म्हटलं की या इंडस्ट्रीमध्ये जितकं आकर्षक दिसता येईल, तितकं दिसायला हवं. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने मला त्याच्या जवळ येण्यास सांगितलं. मी पुढे गेल्यानंतर त्याने मला स्वतः ला स्पर्श करण्यास सांगितलं. मात्र मी त्या गोष्टीला नकार दिला. त्याने मला परत तेच सांगितलं मात्र मी अजिबात ते मान्य केलं नाही, मी माझा नकारावर ठाम राहिलो. त्यामुळे समोरचा व्यक्ती खुपचं भडकला होता. तो माझ्यावर अतिशय रागावला होता. (हे वाचा: ‘बिग बॉस 14’फेम एजाज खान आणि पवित्रा पुनियाचा रोमान्स, मीडियासमोर केलं KISS ) रणवीर सिंग पुढे म्हणाला, मी माझा अनुभव सर्व नवोदित कलाकारांशी शेयर केला आहे. आणि त्यांना याला बळी पडण्यापासून सावध देखील केलं आहे. त्यामुळे बॉलीवूड मध्ये फक्त अभिनेत्रीचं नव्हे तर अभिनेत्यांना सुद्धा कास्टिंग काऊच सारख्या लज्जास्पद प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आणि कास्टिंग काऊच ही बॉलीवूडची एक काळी आणि सत्य बाजू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात