मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Kasab ने ट्रेनिंग घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच Dawood च्या हस्तकांनी घेतलेली ट्रेनिंग, तपासात माहिती उघड

Kasab ने ट्रेनिंग घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच Dawood च्या हस्तकांनी घेतलेली ट्रेनिंग, तपासात माहिती उघड

Arrested Terrorist trained in pakistan terror camp where ajmal kasab trained: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Arrested Terrorist trained in pakistan terror camp where ajmal kasab trained: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Arrested Terrorist trained in pakistan terror camp where ajmal kasab trained: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 15 सप्टेंबर : मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 6 दहशतवाद्यांना अटक (Six terrorist arrest) केली. अटक कऱण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानाताली टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग (Terror Camp in Pakistan) देण्यात आली होती. याच टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब (Kasab) यानेही ट्रेनिंग घेतली होती. यासोबतच इतरही माहिती चौकशीत समोर आली आहे.

थट्टा टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग

मिळालेल्या माहितीनुसार, अटक कऱण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानातील थट्टा टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. फिदाईन हल्ला करण्याचे ट्रेनिंग दिले होते, लोकांना ओलीस ठेवण्याचे ट्रेनिंग तसेच एकाच वेळे अनेक ठिकाणी कसे हल्ले करायचे याचे ट्रेनिंग दिले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. याच टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब यानेही ट्रेनिंग घेतली होती.

पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन, दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर

दिल्लीतील 3 तर मुंबईतील दोन ठिकाणे टार्गेटवर

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर दिल्लीतील राजकीय कार्यालये तसच संसद भवन सारखी महत्वाची कार्यालये टार्गेटवर होती असा संशय तपास यंत्रणांना आहे. मुंबईतील दादर, बांद्रा, प्रभादेवी, याच सोबत दक्षिण मुंबईतील अनेक भागांची रेकी दहशतवादी करण्याच्या तयारीत होते. मात्र, रेकी करण्यापूर्वीच दिल्ली स्पेशल सेलने दहशतवाद्यांचा कट उधळला आणि मुसक्या आवळल्या.

मुंबई लोकलची रेकी?

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबईतील दोन ठिकाणे होती. तसेच या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील अनेक ठिकाणची दहशतवाद्यांनीरेकी केली होती तर मुंबईतील अनेक भागांची रेकी करणार होते.

6 दहशतवादी अटक प्रकरण मास्टरमाईंडच्या कुटुंबीयांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईत राहत होता. या जान मोहम्मदची चौकशी एटीएस पथक करत आहे. मुंबईतील रेकी करण्याआधीच जान याला अटक करण्यात आली आहे. डी कंपनीचा खास आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा हस्तक जान असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच जान याच्यावर भारतात दहशतवाद्या कारवाया करण्याची कामे सोपवली होती.

First published:
top videos