Home /News /news /

महिलेची कमाल! गच्चीवर गार्डनिंग करून बदललं स्वतःचं नशीब; आता कमावते लाखो रुपये

महिलेची कमाल! गच्चीवर गार्डनिंग करून बदललं स्वतःचं नशीब; आता कमावते लाखो रुपये

ही महिला महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावते. पाहूया श्रुती अगरवाल यांची यशोगाथा!

    धमतरी, 23 सप्टेंबर: यशासाठी हार्डवर्कसोबतच स्मार्टवर्कही गरजेचं असतं. छत्तीसगड राज्यातल्या धमतरीमध्ये (Dhamtari) राहणाऱ्या एका महिलेने हेच सिद्ध करून दाखवलं आहे. आपल्या गार्डनिंगच्या (Chhattisgarh woman gardening business) आवडीला कल्पनेची जोड देऊन तिने लाखोंची कमाई करून दाखवली आहे. अवघ्या चार हजार स्क्वेअर फूट गार्डनमध्ये दुर्मीळ झाडं (Earn lakhs by selling rare plants) आणि फुलांचा व्यापार करून ही महिला महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावते. पाहू या श्रुती अगरवाल यांची यशोगाथा! श्रुती यांना आज मिळालेलं यश आपल्याला दिसत असलं, तरी यामागे सहा वर्षांची मेहनत आहे. गार्डनिंगची आवड असणाऱ्या श्रुती (Shruti Agarwal gardening idea) यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या घरी काही शोभेची झाडं आणि फुलझाडंही लावली होती. पुढे त्यांना फेसबुकवर अशीच आवड असणारे इतर लोकही भेटले. मग त्यांनी फेसबुक फ्रेंड्सकडूनच रोपं विकत घेण्यास सुरुवात केली. भरपूर रोपं झाल्यामुळे त्यांनी आपलं गार्डन टेरेसवर (Terrace garden business idea) शिफ्ट केलं. पुढे एवढ्या झाडांची काळजी घेण्यासाठी त्यांनी माळीही नेमला. मग एक दिवस त्यांनी विचार केला, की आपण ज्याप्रमाणे सोशल मीडियावरून रोपं विकत घेतो, त्याचप्रमाणे विकूही (Selling plants on FB) शकतो. मग त्यांनी हळू हळू आपल्याकडची रोपं विकण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी आपल्या छंदाचं रूपांतर बिझनेस आयडियामध्ये केलं. आता याच माध्यमातून दुर्मीळ रोपं विकून त्या महिन्याला साधारणपणे लाखभर रुपये कमावतात. विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींचा केला अभ्यास श्रुती यांनी सांगितलं, की त्यांच्याकडे फर्न, ऑर्किड आणि वॉटर लिलीसारख्या दुर्मीळ आणि महागड्या वनस्पती आहेत. त्यांच्याकडे असणारी बरीच झाडं ही केवळ युरोपामध्ये किंवा हिमालयाच्या (Europian and Himalayan flowers) परिसरात आढळून येतात. छत्तीसगडमध्ये त्यांचं उत्पादन घेण्यासाठी श्रुती यांनी बोटॅनिकल सायन्सचा अभ्यास करून, त्याबाबत अधिक माहिती गोळा केली. ही माहिती त्यांना फेसबुकवरूनच मिळाली. आता श्रुती यांच्याकडे लाखो रुपये किमतीची दुर्मीळ फुलं आणि झाडं आहेत. रोजगारनिर्मिती श्रुती यांनी सांगितलं, की त्यांच्याकडून बहुतांश दुसऱ्या राज्यांमधले किंवा दुसऱ्या शहरांमधले ग्राहक झाडं विकत घेतात. त्या कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी देतात. तसंच, त्या पूर्णपणे अॅडव्हान्स ऑनलाइन पेमेंट घेतात. या व्यवसायातून त्यांनी पाच ते सहा जणांना रोजगारही दिला आहे. श्रुती आता आपला व्यवसाय अधिक मोठ्या स्तरावर नेण्याचा विचार करत आहेत. आपल्या छताऐवजी जमिनीवर एखादी मोठी नर्सरी सुरू करण्याचा त्या विचार करत आहेत. श्रुती यांचे पती ट्रॅक्टरचा व्यवसाय करतात. आपण सुरुवातीला पत्नीला या कामात मदत केली; मात्र पुढची सगळी मेहनत तिचीच असल्याचं ते सांगतात. श्रुती यांची सक्सेस स्टोरी नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विपरीत परिस्थितीमध्ये आणि कमीत कमी साधनांमध्येही केवळ कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर आपण मोठं यश मिळवू शकतो, हेच यातून दिसून येतं.
    First published:

    Tags: Business, Gardening, Success story

    पुढील बातम्या