Home /News /maharashtra /

Osmanabad: अधिकारी होताच विसरला गरीबी; 40 हजारांची लाच घेताना तरुणाला रंगेहाथ अटक

Osmanabad: अधिकारी होताच विसरला गरीबी; 40 हजारांची लाच घेताना तरुणाला रंगेहाथ अटक

Crime in Osmanabad: गेल्याच वर्षी प्रशासकीय सेवेत भरती झालेल्या एका तरुण अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना रंगेहाथ अटक (Red handed) करण्यात आली आहे.

    उस्मानाबाद, 19 जुलै: गेल्याच वर्षी प्रशासकीय सेवेत भरती झालेल्या एका तरुण अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना रंगेहाथ अटक (Red handed) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका गरीब कुटुंबातून संघर्ष करत त्यानं प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवली होती. पण अधिकारी झाल्यानंतर त्याला पैशाचा मोह आवरता आला नाही. अंगणवाड्यांना दिलेल्या गॅस कनेक्शनचं बिल काढण्यासाठी ही लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली असून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित अटक झालेल्या तरुण अधिकाऱ्याचं नाव नारायण दशरथ गायके (Narayan Dashrath gayake) असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा याठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होता. दरम्यान, शासनाच्या योजनेप्रमाणे, तालुक्यातील अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन देण्याचं काम एका एजन्सीला देण्यात आलं होतं. या एजन्सीला 6 हजार 533 रूपये प्रतिगॅस प्रमाणे कंत्राट देण्यात आलं होतं. संबंधित एजन्सीनं तालुक्यातील 86 अंगणवाड्यांना हे गॅस कनेक्शन दिलं होतं. हेही वाचा-उस्मानाबादचा दरोडेखोर नाशकात जाऊन बनला गजरा विक्रेता; कळंबमधील हत्येचा आरोपी अटक या कामाचं 5 लाख 61 हजार 461 रुपये एवढं बिल आलं होतं. पण आरोपी अधिकारी नारायण गायके यानं प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे लाच मागितली. यानुसार 86 गॅस कनेक्शनचे एकूण 48 हजार 461 रुपयांची मागणी संबंधित गॅस एजन्सीकडे केली. पण तडजोड केल्यानंतर आरोपी गायके 40 हजार रुपये लाच घेण्यास तयार झाला. हेही वाचा-चिमुरड्यांनी वाचवले आईचे दागिने; 3 किमी पाठलाग करत चोराला शिकवला धडा पण रविवारी सुट्टीच्या दिवशी आरोपीनं एजन्सीकडून 40 हजार रुपये लाच स्विकारली. यावेळी उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा मारून आरोपी गायके याला रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी परंडा लाचलुचपत विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गायकेची चौकशी सुरू आहे. 32 वर्षीय आरोपी नारायण गायके गेल्याच वर्षी प्रशासकीय सेवेत भरती झाला होता. पण पैसाचा मोह त्याला आवरता न आल्यानं गजाआड होण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Osmanabad

    पुढील बातम्या