जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत

राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचा फायदा होताना दिसत नसल्याचेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत, मात्र ते पुरेसे नसून कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात असल्याचे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र पुढे कडक निर्बंधांची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. (Strict lockdown in the state soon The decision will be taken by the Chief Minister) लोकांमधून 100 टक्के सर्व बंदची मागणी होत आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येतील. कडक लाॅकडाऊनबाबत अजून दोन दिवसात सीएम निर्णय घेतली, असे म्हणत त्यांना राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेत दिले. केंद्र सरकारकडून मदत पुर्नवसनाचे 1600 कोटी येणे अपेक्षित आहे, परंतू अद्याप ते आलेले नाही. कदाचित पुढील काही दिवसात येतील, अशी अपेक्षा आहे. दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात आला असून त्याबाबत माहिती मागितली आहे. त्यानतंर महाराष्ट्रातही ही कदाचित लाॅकडाऊन नियमावलीत काही बदल करण्यात येईल. राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचा हवा तितका फायदा होताना दिसत नाही, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. हे ही वाचा- राज्यात कोरोनाचं रौद्र रुप! प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत 6 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर काही राज्यांनी आठवडी लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यूची घोषणा केली आहे. दरम्यान राज्यभरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. कोरोनाचा आकडा वाढत असल्याने ठाकरे सरकार कडक लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात