मांजरावरून झालं भांडण, सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच जमावाचा हल्ला

मांजरावरून झालं भांडण, सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच जमावाचा हल्ला

हल्यात काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

ठाणे 15 मे: लॉकडाऊनच्या काळातही मुंब्र्यात तुफान हाणामारी झाली. धक्कादायक म्हणजे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक केली. मुंब्रा इथं ही घटना घडली आहे. मांजराचा त्रास होत असल्याने एकमेकांशी भिडलेल्या शेजाऱ्यांची हाणामारी सोडविण्यासाठी पोलीस गेले आणि पोलिसांवरच जमावाने दगडफेक करुन ह्ल्ला केला. हल्यात काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फेमस काँलनी भागातील साईकिरण सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर नासीर पटेल कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या पटेल कुटुंबाच्या घरी असलेल्या मांजरीचा त्रास होतो. मांजरीला घरात ठेवा अशी तक्रार सोसायटीमध्ये रहात असलेल्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबाकडे केली होती. त्यावरून उदभवलेल्या वादावादीत नासीर पटेल तसेच, त्यांची मुले फहाद, फरहान, परेश, फराज व जरीना आणि आरीफ पतंगवाला यांनी लोखंडी राँड, लाकडी बांबू आणि सळीने मारहाण करण्यास सुरवात केली.

यावेळी परेश याने मोबाईल हिसकावला तर,फहादने विनयभंग केल्याची तक्रार यास्मीन खान हिने दाखल केली आहे. दरम्यान,दोन्ही कुटुंबातील भांडण सोडवण्यासाठी सहा.पोलीस निरिक्षक बोरसे यांचे पथक घटनास्थळी पोहचले तेव्हा,पोलिस शिपाई मयुर लोखंडे तसेच अन्य पोलिसांच्या दिशेने जमावाने तुफान दगडफेक केली.

महाराष्ट्रात पोलिसांभोवती कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांची संख्या झाली 1000 पार

यात लोखंडे याच्या पायाला मार लागला असून,पोलिस शिपाई परब याच्या दुचाकीचे नुकसान झाले. दरम्यान,घटनेचे चित्रण करत असलेल्या इस्माईल खान याचा कॅमेरा अनोळखी व्यक्तीने लांबवला.

BREAKING: नवी मुंबईत APMC मार्केटमधील 2 व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

याप्रकरणी, लोखंडे यानी दाखल केलेल्या तक्रारीवरुन शादाब खान,हैदर खान,शोहेब खान,रमजान इदरिसी,हसिब शेख,नदीम कुरेशी,इब्राहिम खान,यासीन कुरेशी,अब्दूल छत्रीवाला,मो.तारीख जाफरानी,सुफीयान खान,काशिफ,सुफियान खान,आरीफ पतंगवाला याच्यांसह 40 ते 50 अनोळखी व्यक्तीविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात करीत आहेत.

 

 

First published: May 15, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या