मुंबई, 15 मे : राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना या व्हायरसने सर्वसामान्यांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच टार्गेट केलं आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 61 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये 112 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर या आजारात 9 पोलिसांनी आपला जीवही गमावला आहे.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कष्ट घेणाऱ्या पोलिसांनाच या व्हायरसचा धोका वाढला आहे. कोरोनाचं हे थैमान सुरू असताना एक दिलासादायक आकेडवारी म्हणजे आतापर्यंत 174 पोलीस कोरोनाला हरवत सुखरूप घरी परतले आहेत.
1061 personnel of Maharashtra Police including 112 police officers have been tested positive for #COVID19 so far. Out of the total infected police personnel, 174 have been cured while 9 others lost their lives: Maharashtra Police pic.twitter.com/HgNkrDBpeZ
— ANI (@ANI) May 15, 2020
ही बातमी अपडेट होत आहे.