BREAKING: नवी मुंबईत APMC मार्केटमधील 2 व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

BREAKING: नवी मुंबईत APMC मार्केटमधील 2 व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 15 मे: देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार झपाट्यानं होत आहे. देशातील कोरोनामुळं सगळ्यात जास्त प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 998 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडली आहेत. तर, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेतील (Agricultural Produce Market Committee) दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एपीएमसीमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दोन्ही कांदा-बटाटा व्यापारी होती. दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा.. कोरोनामुळे साखर उद्योग मोठ्या संकटात, शरद पवारांनी मोदी सरकारला सुचवले 5 उपाय

दरम्यान, आतापर्यंत मार्केटमध्ये एकूण 117 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 55 रुग्ण एपीएमसीमध्ये काम करणारे आहेत. त्यात व्यापारी, कर्मचारी आणि मजुरांचा समावेश आहे. तर 62 जण एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत.

मुंबईत एका तासाला एक मृत्यू...

मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. एकट्या मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 19 हजार 579 आहे. तर 621 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 27 हजारहून अधिक आहे.

गेल्या 24 तासांत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1019 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

हेही वाचा.. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरात घुसला कोरोना, केलं सेल्फ क्वारंटाइन

भाजप आमदारनं केली ही मागणी..

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेतील व्यापाराची पद्धत बदलली नाही तर या 17 तारखेपर्यंतच्या लॉक डाऊन नंतरही एपीएमसी बाजारपेठ सुरू करू नये, अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण एपीएमसी संबंधित असल्याने सध्या बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. या पाच ही बाजारपेठा येत्या 18 तारखेपासून पुन्हा सुरू करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. मात्र, व्यापाराच्या पद्धतीमध्ये सुधारणा होत नसेल तर पुन्हा कोरोनाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच व्यापार करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा होत असेल तरच एपीएमसी सुरू करा अन्यथा बंद ठेवा, अशी मागणी गणेश नाईक यांनी केली आहे.

First published: May 15, 2020, 12:28 PM IST

ताज्या बातम्या