मुंबई, 5 जुलै : स्पाईसजेटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास खरंच जोखमीचा होता. कारण एकाच दिवशी स्पाईसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची तातडीने एमर्जन्सी लँडींग करावी लागली आहे. विशेष म्हणजे यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला भारताहून दुबईला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्या विमानाची पाकिस्तानच्या कराची विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या घटनेची जगभरातील प्रसारमाध्यांनी दखल घेतली. ही बातमी ताजी असतानाच मुंबईतदेखील स्पाईसजेटच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. मुंबईत नेमकं काय घडलं? स्पाईसजेटच्या आज सकाळी भारताहून दुबईच्या दिशेला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे पाकिस्तानात त्या विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना अवघ्या काही तासात भारतातही तशाचप्रकारची एक घटना समोर आली. गुजरातच्या कच्छ येथील कांडला येथून निघालेल्या विमानाच्या वींडशिल्डचा बाहेरच्या भागाला भेगा पडल्या. त्यामुळे विमानाची एमर्जन्सी लँडिंग करावी लागली.
On 5th July, 2022, SpiceJet Q400 aircraft was operating SG 3324 (Kandla - Mumbai). During cruise at FL230, P2 side windshield outer pane cracked. Pressurization was observed to be normal. The aircraft landed safely in Mumbai: SpiceJet Spokesperson pic.twitter.com/DYypQXmTyk
— ANI (@ANI) July 5, 2022
( धाकधूक वाढली, कोल्हापुरात कोसळधार, कोकणातही पावसाचा हाहाकार, महाराष्ट्रासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे ) स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. 5 जुलै 2022 रोजी, स्पाईसजेट Q400 विमान SG 3324 चालवत होते. तेव्हा P2 बाजूच्या विंडशील्डचा बाह्य पॅन FL230 वर क्रॅक झालं. त्यामुळे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले, अशी प्रतिक्रिया प्रवक्त्यांनी दिली. विशेष म्हणजे स्पाईसजेटच्या विमानांची तांत्रिक बिघाडाची ही गेल्या 15 दिवसांतील ही सहावी घटना असल्याची माहिती समोर आली आहे.

)








