Home /News /mumbai /

कांदिवली बनावट लसीकरण प्रकरण; Co-WIN App वर डेटा अपलोड करणाऱ्या महिलेची चौकशी, होणार मोठे खुलासे

कांदिवली बनावट लसीकरण प्रकरण; Co-WIN App वर डेटा अपलोड करणाऱ्या महिलेची चौकशी, होणार मोठे खुलासे

Crime in Mumbai: कांदिवली परिसरातील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत एका बनावट लसीकरण शिबीराचं (fake vaccination camp) आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी अनेकांना बनावट लशी देण्यात आल्या होत्या.

  मुंबई, 25 जून: 30 मे 2021 रोजी मुंबईच्या (Mumbai) कांदिवली परिसरातील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत एका बनावट लसीकरण शिबीराचं (fake vaccination camp) आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी अनेकांना बनावट लशी देण्यात आल्या होत्या. या बनावट लसीकरण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक (6 arrest) करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असून संबंधित महिला Co-WIN App वर डेटा अपलोड करण्याचं काम करते. या महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांडून व्यक्त करण्यात आली आहे. गुडिया असं संबंधित महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. गुडिया ही नागरिकांच्या लसीकरणाचा डेटा Co-WIN App वर अपलोड करण्याच काम करत होती. त्याचबरोबर लसीकरणाचं प्रमाणपत्र जनरेट करण्याच कामही गुडिया करत होती. त्यामुळे कांदिवली पोलीस संबंधित महिलेची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी कोण कोण गुंतले आहेत, याचा खुलासा या महिलेकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बनावट लसीकरणाचं मोठं रॅकेट उघड होऊ शकतं. दुसरीकडे, या प्रकरणातील अन्य एक आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला तर डॉ. त्रिपाठीला अटक होण्याती शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही बनावट लसीकरण प्रकरणाबाबत बराच खुलासा होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. हेही वाचा-पत्नी कोरोना लस घेण्यासाठी जाताच पती आधार कार्ड घेऊन चढला झाडावर, वाचा कारण नेमकं प्रकरण काय आहे? 30 मे 2021 रोजी कांदिवली परिसरातील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत एका कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी अनेक लोकांना बनावट लशी टोचल्या होत्या. पण नंतर हे लसीकरण शिबीर बनावट असल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर अनेकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत, गुन्हा दाखल केला होता. कांदिवलीसह खार, वर्सोवा आणि बोरिवली पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Corona vaccine, Crime news, Mumbai

  पुढील बातम्या