पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास !

या सगळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही या मार्गांचा वापर करू शकतो.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2018 10:48 AM IST

पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास !

मुंबई, 03 जुलै : काल रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे अंधेरी-विरार वाहतूक ठप्प झाली आहे. अंधेरीजवळ लोकलच्या रुळावर पुलाचा काही भाग कोसळला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तांना रस्त्यावरील वाहतुक सुरळीत ठेवण्याचं तसंच बेस्टच्या अतिरिक्त सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

LIVE : डबेवाले जागोजागी स्टेशनला अडकून पडल्याने आज डबेवाल्यांची सेवा बंद

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल आणि बीएमसी कमिशनर अजॉय मेहतांशी फोनवरून बातचीत करत घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि सुरक्षा राहण्याची सुचना दिली आहे.

या सगळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही या मार्गांचा वापर करू शकतो.

Loading...

- पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एसवी रोडवर ट्राफिक असल्यानं ठाण्याला उतरून घोडबंदर रोडवरून बोरिवलीकडे जाता येईल.

- तिथून डाऊनला विरारकडे जाऊ शकता

- हार्बर मार्गावरील प्रवासी आज मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतात.

- अन्यथा सीएसटीवरून चर्चगेटला जाऊन डाऊनला जाता येईल.

- मध्यरेल्वेवरून पश्चिम रेल्वेवर जाणाऱ्यांसाठी घाटकोपर मेट्रो हा पर्याय आहे.

- प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे रेल्वेस्थानकांवरून जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार

- बेस्टनं बोरिवली ते चर्चगेट दरम्यान अतिरिक्त बसेस सोडल्या

- अंधेरी स्थानकावरून विविध मार्गांवर बेस्टच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.

- गर्दी नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असल्याचीही माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

- अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.

हेही वाचा...

प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार

सावधान, यापुढे पंजाबमध्ये ड्रगची तस्करी केल्यास...!

जुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...