#rain update

Showing of 1 - 14 from 21 results
VIDEO : जवान तुझे सलाम!, बाळाला केलं सुखरूप एअरलिफ्ट

व्हिडिओAug 19, 2018

VIDEO : जवान तुझे सलाम!, बाळाला केलं सुखरूप एअरलिफ्ट

केरळच्या इतिहासातला 100 वर्षातला सर्वात भयंकर आणि मोठा पूर आहे. या पुरात आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून 2 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहे. भारतीय सैन्य जीवाची बाजी लावून लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. असाच एक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय. यात एका बाळाला एअरलिफ्ट करण्यात आलंय. जवानाने हेलिकॉप्टरच्या साहय्याने या बाळाला एअरलिफ्ट केलं. हेलिकॉप्टरमध्ये आल्यानंतर जवानाने या चिमुकल्याला आईकडे सोपवलं. आपल्या काळजाचा तुकडा कुशीत आल्यानंतर आईने लाडाने आपल्या बाळाची मुक्का घेतला. तिच्या चेहऱ्यावर आपल्या चिमुरड्याला वाचवण्याचा आनंद लपून राहिला नाही.

Live TV

News18 Lokmat
close