जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / दुकानदारांनो, मराठी पाट्या लावल्या का? BMC आता कारवाईच्या तयारीत

दुकानदारांनो, मराठी पाट्या लावल्या का? BMC आता कारवाईच्या तयारीत


मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने-आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेनं काढला होता

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने-आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेनं काढला होता

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने-आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेनं काढला होता

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मे : दुकानावरील पाटी ही मराठी (marathi sign board rules) असलीच पाहिजे, असा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मुंबईतील दुकानांवरच्या मराठी पाट्यांकरता मुंबई  महापालिकेची (mumbai municipal corporation) कारवाई पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईतील दुकानांनी मराठीतील पाट्या लावून घ्याव्यात, अशी सूचना केली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने-आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेनं काढला होता, त्याकरता आजची 31 मे पर्यंतची मुदतही दिली होती. यानुसार अनेक दुकानांनी आपले इंग्रजी नामफलक बदलले मात्र अनेक दुकानांचे नामफलक अजूनही मोठ्या इंग्रजी अक्षरातच आहेत. आजच्या मुदतीनंतर महापालिका प्रशासन पुढील एका आठवड्यापर्यंत सर्वेक्षण करेल आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात करेल. मुंबईत सुमारे 4.50 लाख दुकाने पालिकेच्या रडारवर आहे. दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत, देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसंच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असले पाहिजे  याबाबतचा शासन निर्णय १७ मार्च २०२२ रोजी जारी करण्यात आला.  तसंच महापालिकेनंही परिपत्रक काढून मुंबईतील दुकाने- आस्थापनांना नामफलक मराठीत रुपांतरीत करण्याविषयी आवाहन केले होते. कारवाई कशी होणार? पहिल्या टप्प्यात दुकानांची पाहणी करण्यात येणार असून मराठी नामफलक बंधनकारक असल्याबाबत दुकानदार व आस्थापना यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने व अस्थापना कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. नामफलक मराठीत नसल्यास पालिका कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ( चंद्राच्या गाण्याने थेट श्रेया घोषालला लावलं वेड! चंद्रमुखीचा fever अजूनही कायम ) नोटिशीनंतरही नामफलकात बदल न केल्यास न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होईल. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे असू नयेत. या नियमाचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात