मुंबई, 7 एप्रिल : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याच्या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत आहेत. याप्रकरणातच ACP संजय पाटील यांनी 22 मार्च रोजी दिलेल्या जबाबातून आणखी एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. ‘सचिन वाझे याने पैशाच्या वसुलीबाबत सांगितलं होतं,’ अशी कबुली संजय पाटील यांनी दिली आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला वसुलीबाबत सांगितलं आहे, असं सचिन वाझे यांनी मला सांगितलं,’ अशी कबुली चौकशीदरम्यान जबाब देताना संजय पाटील यांनी दिली आहे. तसंच गृहमंत्र्यांच्या भेटीविषयीही संजय पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हेही वाचा- राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट ‘मी ज्ञानेश्वरी बंगल्यावर गेलो होतो. यावेळी मी गृहमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला भेटलो. मात्र गृहमंत्र्यांना भेटलो नाही. तसंच वसूली बाबत काही चर्चा झाली नाही,’ असं स्पष्टीकरण जबाबावेळी ACP संजय पाटील यांनी दिलं आहे. सचिन वाझे प्रकरणात परमवीर सिंह यांच्याही अडचणी वाढणार? सचिन वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. सचिन वाझे यांच्या नियुक्तीची शिफारस ही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनीच केली असल्याचा दावा आता एका पत्राच्या आधारे केला जात आहे. त्यामुळे परमवीर सिंह हे अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रकरणात CBI ची एण्ट्री मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप केल्याप्रकरणी CBI चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे CBIकडून सचिन वाझे याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. CBIने याबाबत NIA कोर्टात मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून आगामी काळात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.