Home /News /crime /

Shocking VIDEO : आधी बाईकवरुन ढकललं, अन् अगदी जवळ येऊन झाडल्या गोळ्या

Shocking VIDEO : आधी बाईकवरुन ढकललं, अन् अगदी जवळ येऊन झाडल्या गोळ्या

चार तरुणांनी भररस्त्यात अगदी जवळ येऊन व्यक्तीवर गोळ्या झाडल्या.

    मुरैना, 9 डिसेंबर : जमिनीवरील वादातून मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) मुरैना येथून एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking VIDEO) समोर आला आहे. या प्रकरणात कपड्याने चेहरा लपवलेल्या काही तरुणांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला आधी धक्का दिला. यामुळे ती व्यक्ती खाली पडली. यानंतर आलेले तरुण गोळी चालवू लागले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अंबाह पोलीस ठाणे हद्दीकील जयेश्वर रोडवर सायंकाळी ही घटना घडली. या हल्ल्यानंतर तातडीने जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचार करून ग्वाल्हेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेतील सहभागी चार तरुणांपैकी दोघांची ओळख पटली आहे. अंबाह पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या चारही तरुणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून उर्वरित दोन तरुणांचा शोध सुरू आहे. एकंदर व्हिडीओ पाहता मी मुलं नवखी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही पैशांसाठी हे कृत्य करवून आणलं असावं, असा कयास बांधला जात आहे. दरम्यान अशा घटनांमुळे देशातील सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केला जातो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh, Shocking video viral

    पुढील बातम्या