जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mansukh Hiren death case प्रकरणी 'त्या' व्होल्वो गाडीबद्दल धक्कादायक माहिती समोर

Mansukh Hiren death case प्रकरणी 'त्या' व्होल्वो गाडीबद्दल धक्कादायक माहिती समोर

Mansukh Hiren death case प्रकरणी 'त्या' व्होल्वो गाडीबद्दल धक्कादायक माहिती समोर

आज पहाटे एटीएसच्या टीमने दमन येथून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. या कारचा वापर…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren death case) रोज नवनवीन खुलासे होते आहे. महाराष्ट्र एटीएसच्या (ATS) पथकाने दमन इथून एक व्होल्वो कंपनीची (volvo car) महागडी गाडी जप्त केली आहे. या गाडीचा वापर मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी करण्यात आला असावा, असा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. आज पहाटे एटीएसच्या टीमने दमन येथून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. या कारचा वापर मनसुख यांच्या हत्येसाठी केला असावा असा अंदाज एटीएसला आहे आणि म्हणूनच आता एटीएस या कारची फोरेंन्सिक तपासणी करत आहे. या कारसाठी आज पहाटे दमन येथे एटीएस ने छापा टाकला होता. ही व्होल्वो कार MH 05 DH 6789   महागडी गाडी जप्त केली आहे.  सचिन वाझे यांच्या पार्टनटरची ही गाडी असल्याचे बोलले जात आहे. गाडीचा नेमका वापर काय आणि कशासाठी  करण्यात आला याचा तपास ATS करत आहे. मात्र, तपासात व्होल्वो गाडीचा सारखा उल्लेख आल्याने ATS ने केली कारवाई केली आहे. घरबसल्या असं मिळवा तुमचं डिजिटल Voter ID; जाणून घ्या प्रक्रिया मनसुख हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर ठाणे ATS ने दोन आरोपींना अटक केली आहे. सोमवारी देखील ठाणे ATS ने अनेक ठिकाणी झाडझडती घेतल्यानंतर आता मोठी कारवाई देखील केली आहे. काहीही झालं की राष्ट्रपती राजवटीची मागणी’, जयंत पाटलांचा भाजपला टोला दरम्यान, ATS ने दमन येथून जप्त केलेल्या व्होल्वो गाडीची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या गाडीतून दोन बॅग्स आणि त्यात तीन जोडी कपडे मिळाले आहेत. दोन मोबाईल चार्जिंग, एक मास्क आढळून आला आहे. फॉरेन्सिकच्या 3 टीम गाडीचा तपास करत आहे. सचिन वाझेंकडून बनावट आधार कार्ड जप्त तर दुसरीकडे  सचिन वाझे प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.  हॉटेल ट्रायडेंटमध्ये सचिन वाझे मुक्कामी होता. त्यावेळी त्यांनी खोटं आधारकार्ड देवून राहिला असल्याची माहिती समोर आली आहे. सुशांत सदाशिव खामकर या नावाने बोगस आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये वाझे यांनी अनेक जणांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. बुकी नरेश गोर पण याच ठिकाणी वाझेंना भेटला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात