मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ओवेसींचा पक्ष गुप्त शाखा आहे हे मान्य करावे' सेनेचा भाजपला सणसणीत टोला

ओवेसींचा पक्ष गुप्त शाखा आहे हे मान्य करावे' सेनेचा भाजपला सणसणीत टोला

ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. फोडा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे.

ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. फोडा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे.

ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. फोडा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे.

मुंबई, 16 जानेवारी : 'भारतीय जनता पक्ष (BJP) इतरांना नैतिकतेचे व हिंदुत्वाचे धडे देत असतो. त्या शुद्ध हिंदुत्वात ओवेसीच्या (Asaduddin Owaisi) उंगल्याही बुडत असतात, असा टणत्कार साक्षी महाराजांनी (sakshi maharaj) केला आहे. ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. फोडा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे. भाजपचा परवरदिगार भगवंत साक्षी महाराजांना अधिक शक्तिमान करो. शक्तिमान होण्याची मक्तेदारी काय फक्त मियाँ ओवेसींचीच आहे? असा सणसणीत टोला शिवसेनेनं (Shivsena) भाजपला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

'ओवेसी साहेबांची पोलखोल भारतीय जनता पक्षानेच केल्याने काही प्रमाणात दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. ओवेसी मियाँचे ‘एमआयएम’ पात्र हे मुसलमानांचे तारणहार नसून भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र असल्याच्या शंका लोकांना होत्याच, पण भाजपचे प्रमुख नेते साक्षी महाराज यांनी आता ठणकावून खरे सांगितले आहे की, ‘‘होय, मियाँ ओवेसी हे भाजपचेच पोलिटिकल एजंट असून ओवेसीच्या मदतीनेच आम्ही निवडणुका जिंकत असतो.’’ साक्षी महाराज म्हणतात, ‘ओवेसी मदतीला होते म्हणून आम्ही बिहार जिंकले. आता ओवेसीसाहेब आम्हाला प. बंगाल आणि उत्तर प्रदेशातही मदत करतील. ओवेसींची मदत भाजपास होते ही भगवंताचीच कृपा आहे. परवरदिगार भगवंत ओवेसींना अधिकाअधिक शक्तिमान करो!’ साक्षी महाराजांनी भाजपचे अंतरंगच उघडून दाखवले. कमळाच्या फुलातील कुंजबिहारी हे अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, अडवाणी, मोदी, अमित शहा असावेत या भ्रमातून साक्षी महाराजांनी लोकांना बाहेर काढून कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ ओवेसी आहेत हेच दाखवले आहे' असा सणसणीत टोला सेनेनं भाजपला लगावला.

'प. बंगालात मियाँ ओवेसी यांनी जे कार्य सुरू केले आहे, त्यामुळे भाजपचे चेहरे आनंदाने फुलू लागले आहेत. ओवेसी यांच्या सहकार्याने भाजपास बंगाल जिंकायचा आहे. म्हणजे हिंदुत्वविरोधी शक्तीचा वापर करूनच हिंदुत्वाचा जयजयकार करायचा आहे. मियाँ ओवेसी हे एक निष्णात कायदेपंडित आहेत. त्यांचे जे काही राजकारण आहे ते त्यांच्यापाशी. मुसलमानांचा जीवनस्तर सुधारावा, मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनातील अंधार व धर्मांधता दूर व्हावी यासाठी ओवेसींसारख्या विद्वानांनी काम केले तर राष्ट्राचे भले होईल; पण हिंदुस्थानच्या पोटात वाढणाऱ्या दुसऱ्या पाकिस्तानला अधिक जहरी धर्मांध बनवून ते राजकारण करीत आहेत. त्यांचे राजकारण हिंदुद्वेषावर आधारित आहे. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मधल्या काळात ज्याप्रकारची जहाल वक्तव्ये केली ती धक्कादायक आहेत. ‘24 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना बाजूला करा, मग बघा काय करून दाखवतो ते.’ अशी बेताल भाषा ओवेसी यांचे बंधू जाहीरपणे करत होते. आता हेच ओवेसी भाजपच्या विजयरथाचे मुख्य चाक बनले आहे. भारतीय जनता पक्षाने ओवेसीसारख्यांची मदत घेऊन फायद्याचे राजकारण करावे, पण मग आम्हीच कसे राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादी आहोत असले ‘टेंभे’ यापुढे मिरवू नयेत. मियाँ ओवेसीचा पक्ष ही आमचीच एक गुप्त शाखा आहे हे त्यांनी मान्य करावे' अशी थेट मागणीच सेनेनं भाजपकडे केली आहे.

First published:
top videos

    Tags: Asaduddin owaisi, Sakshi Maharaj